*अमरावती शहरामध्ये महिलांवर अत्याचार करून घर फोडणारी टोळी सक्रिय…. मुख्य सूत्रधार किशोर देविदास चौधरी*
विदर्भातील अमरावती शहर हे अतिशय सुंदर आणि सुसंस्कृत लोकांचे शहर मानले जाते तसेच अंबादेवी करिता प्रसिद्ध असे अमरावती शहर येथे कायदा व सुव्यवस्था अगदी काटेकोरपणे पाळले जाते परंतु गेल्या काही दिवसापासून अमरावती शहरांमध्ये एकटी निराधार महिला घरामध्ये असताना रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन 70 ते 80 लोकांची महिला पुरुष अशी टोळी अचानक घरामध्ये घुसून एकटी निराधार महिला बघून तिच्यावर अत्याचार करून व घरातील लहान-मोठे मुलांना सुद्धा जीवे मारून घर फोडणारी टोळी मागील काही दिवसापासून अमरावती शहरांमध्ये सक्रिय झाली आहे अशीच एक घटना शनिवारी दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 सुमारास राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी प्लॉट येथे घडली आहे घरामध्ये एकटीच निराधार महिला व लहान मुले असताना घरामध्ये कुठलीही पुरुष मंडळी नाही याचा फायदा घेऊन अचानक रात्री 8 सुमारास काही महिला व पुरुष असे 70 ते 80 लोक अचानक बालाजी प्लॉटमधील रहिवासी पीडित महिला यांच्या घरात घुसले दरवाजाला आता बुक्क्या मारत व भिंतीवरून उड्या मारून महिलेवर अत्याचार करण्याचा हेतूने व लहान मुलांना जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न या टोळीने केला परंतु महिलेने स्वतःला एका खोलीत कोंडून तात्काळ पोलिसांच्या 112 हेल्पलाइन वर फोन केला असता तात्काळ पोलीस बालाजी प्लॉट येथे हजर झाले परंतु पोलीस येण्याचा सुगावा लागतात घर फोडणारी टोळी यांनी धूम ठोकली सर्व महिला पुरुष पळून गेले सदर घटने संबंधित पीडित महिलेने शनिवारी रात्री दहा वाजता राजापेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे परंतु एवढी मोठी अमरावती शहराला काळीमा फासणारी घटना होऊन सुद्धा चार दिवसानंतर राजापेठ पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची तसदी घेतली आहे परंतु या टोळीचा मुख्य सूत्रधार किशोर देविदास चौधरी व टोळी मधील महिलांची मुख्य सूत्रधार अनु नावाची महिला आहे आजही हे कुख्यात गुन्हेगार व 70 ते 80 लोकांचा समूह अमरावती शहरांमध्ये खुलेआम फिरत आहे बालाजी प्लॉट येतील झालेली घटना ही संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे त्यामुळे शहरांमध्ये घडलेल्या या भयंकर प्रकाराला आळा घालण्यासाठी व शहरांमध्ये अजून या टोळी पासून दुसरी कुठली अनुचित घटना घडू नये त्याकरिता राजापेठ पोलीस व अमरावती पोलीस यांच्याकडून कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात अजून किती वेळ लागतो की बालाजी प्लॉटमधील घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट अमरावती पोलीस कडून बघितली जात आहे का? तसेच बालाजी प्लॉटमधील झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटने विरुद्ध त्या निराधार महिलेला पोलिसांकडून न्याय मिळेल का?असे अनेक प्रश्नचिन्ह अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा निर्माण होत आहेत अमरावती शहरातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे