आयएएस पूजा खेडकर प्रमाणेच पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोकार यांच्या बेभान कार्यपद्धतीवर संशय..
Salim Khan 24 june 2025
मिनी मंत्रालय जिल्हा परिषद मधील अधिकारी बेभान.. महिला बाल विकास विभाग भगवान भरोसे.. अनुकंपाधारक पर्यवेक्षिका यांचे कार्यालयीन रेकॉर्ड गायब..

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत महिला बाल विकास विभागामध्ये मागील चार वर्षापासून कार्यरत असलेल्या अनुकंपाधारक पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांच्या नियुक्ती पासून च्या कार्यालयीन कामकाजाचा व दौऱ्यांचा लेखाजोखा गायब असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.शेंगोकार यांची नियुक्ती प्रचलित परंपरेनुसार सहानुभूतीपूर्वक अनुकंपा तत्त्वावर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून अकोट आयसीडीएस कार्यालय येथे झाली होती परंतु रुजू झाल्यापासूनच चर्चेत असलेले प्रकरण आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रमाणे शेगोंकार यांचा सुद्धा मनमानी कारभार सुरू आहे त्यांच्यावर कोणताच अधिकारी आजपर्यंत नियंत्रण आणू शकला नाही तसेच कार्यालयीन कामकाज व दैनंदिन दौरा चे रेकॉर्ड सुद्धा कार्यालयात उपलब्ध नाहीत नियमानुसार सर्कल अंतर्गत असलेल्या मुख्यालयात वास्तव्यास असणे आवश्यक आहे परंतु प्रतीक्षा शेगोंकार यांचे सर्व कार्यालयीन कामकाज हे अकोला येथे कायम वास्तव्यास असलेल्या घरूनच सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे

या चार वर्षाच्या कार्यकाळात सर्कलमधील अनेक गावात आजपर्यंत एकही दौरा केला नसल्याच्या अनेक तक्रारी गावकऱ्यांकडून सतत केल्या जात आहेत यादरम्यान प्रतीक्षा शेगोंकार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास संबंधितांवर खोटे आरोप करून गंभीर गुन्हे दाखल करण्याची परंपरा सुद्धा शेगोंकार यांनी सुरू केली आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरलेली असून ” नाजूक जागेवरचं दुखणं झालेले आहे” असे अनेक अधिकारी खाजगीत प्रतिक्रिया व्यक्त करतात
सोबतच कोणताही अनुभव व प्रशासकीय ट्रेनिंग नसताना शेगोंकार यांची प्रशासनातील इतर विभागात नियुक्ती न करता थेट पर्यवेक्षिका या पदावर शासनाच्या कोणत्या नियमानुसार नियुक्ती करण्यात आली असे आश्चर्यचकित करणारे प्रश्न सुद्धा या निमित्ताने अनेकांनी उपस्थित केले आहेत या सर्व गंभीर प्रकाराला वरिष्ठ अधिकारी सुद्धा कंटाळले असून प्रतीक्षा शेगोंकार समोर मात्र हतबल झाल्याचे दिसून येते

प्रतिक्रिया
पर्यवेक्षका प्रतीक्षा शेंगोकार यांची कार्यपद्धती अहंकारी स्वरूपाची आहे आजपर्यंत सर्कल मधील अनेक गावात त्यांनी प्रत्यक्ष दौरा सुद्धा केलेला नाही प्रत्येक महिन्याच्या शेवटी सर्व सेविकांची मीटिंग घेऊन त्यामध्येच निर्देश देण्यात येतात व मागील तारखेत शेरा सुद्धा मारण्याचे काम शेंगोंकार मॅडम करीत असतात
अंगणवाडी सेविका अकोट उपविभाग







