इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश..अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी बस सुरू..
गोरगरिबांचा विचार व्हावा याकरिता मागील महिनाभरापासून एसटी सुरू करण्याची सततची मागणी व पाठपुरावा रविराज मोरे यांनी बांधकाम अभियंता श्री प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली असल्याने त्याचे फलित म्हणून आज पासून पूर्ण क्षमतेने अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली..
Kailas Akarte 4 August 2023
Akot : मागील गेल्या दोन वर्षापासून अकोट अकोला रस्त्यावरील वाहतूक ही गांधीग्रामच्या पुलामुळे जवळपास बंदच आहे त्यादरम्यान वाहतूक सुरळीत होण्याकरीता पर्याय म्हणून नॅशनल हायवे अथॅरिटी यांनी ४ करोड रुपये खर्चून तात्काळ पर्यायी पुलाचे बांधकाम करून अकोला अकोट रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु हा ४ करोड रुपयांचा पुल पहिल्याच पावसात दोन महिन्यातच वाहून गेला हा जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे अशी चर्चा जनमानसात बघायला मिळाली.. त्यामुळे दोन महिने सुरू असलेली वाहतूक पुन्हा बंद पडली व अपूर्ण असलेला गोपालखेड मार्गे रस्ता हा घाई घाईने सुरू करण्यात आला .परंतु या मार्गावरून एसटी वाहतूक यांना परवानगी देण्यात आली नाही पण छुप्या मार्गाने लक्झरी बस व सर्वंच प्रकारची जड वाहतूक मुक संमतीने सुरू करण्यात आली परंतु एसटीला मात्र प्रशासनाकडून परवानगी दिल्या जात नव्हती त्यामुळे इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा श्री रविराज मोरे यांनी गेल्या महिन्यापासून सतत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी यांना वारंवार ही बाब लक्षात आणून दिली व गोरगरिबांचा विचार व्हावा.. अशी विनंती करीत अकोट अकोला एसटी सुरू करण्याची मागणी केली त्याचे फलित म्हणून आज पासून अकोट अकोला गोपालखेड मार्गे एसटी वाहतूक सुरू करण्यात आली यामुळे अनेक खेड्यापाड्यांसह अकोट वासियांचा मार्ग सुकर झाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे ..बांधकाम अभियंता प्रसाद पाटील व जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होत असून येणाऱ्या डिसेंबर महिना अखेर पर्यंत संपूर्ण डांबरीकरण होऊन वाहतुकीसाठी रस्ता तयार होईल अशी हमी सुद्धा बांधकाम अभियंता प्रसाद पाटील यांनी दिली तसेच कमीत कमी वेळात रस्ता उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त होत आहेत..