hacklink al hack forum organik hit kayseri escort casibom 895 com girispadişahbet güncel girişdeneme bonusu veren siteler463 marsbahisdeneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinetürbanlı porno izle izmir escortvaycasino1winbetbigobetmatiktipobetcasibomgrandpashabetistanbul escortmatbet girişmatbet

INDIA NEWS

Press

ठरले तर मग ! आ.प्रकाश भारसाकळे च्या विरोधात रणशिंग फुंकायचे..

Salim Khan 17 May 2024

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे

मागील दहा वर्षापासून अकोट विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिनिधित्व जवळपास सर्वच भाजपा कार्यकर्त्यांनी नाकारल्याचे दिसते.. जुन्या फळीतील एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आज रोजी आ. भारसाकळेंच्या आसपासही फटकत नाही.. ज्या पदाधिकाऱ्यांनी ,कार्यकर्त्यांनी भाजप गावागावात पोचवली लोकांच्या मनामनामध्ये कमळ फुलवले आज त्याच कार्यकर्त्यांची फरफट सुरू आहे विद्यमान आमदार भारसाकळेंच्या कार्यपद्धतीमुळे गुदमरून भावनांचा आक्रोश येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे..

भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत तयार झालेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा अभाव सतत तालुक्यामधील कार्यकारणी मध्ये जाणवला आहे त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये पक्षाशी सदैव एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते यांनी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरुद्ध उमेदवारी घेण्याकरिता जय्यत तयारी सुरू असल्याचे बोलले जाते..

काल परवा एका पारिवारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कनक कोटक यांनी येणाऱ्या विधानसभेकरिता इच्छुक असल्याचे चित्र सर्व निमंत्रित मंडळी समोर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे… सोबतच तेल्हारा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर यांनी सुद्धा कंबर कसली आहे तेल्हारा तालुक्यातील आमदार झाल्याशिवाय तेल्हारा तालुक्याचा विकास हा होणार नाही असे जयश्री ताईंचे स्पष्ट मत आहे

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत येणारी विधानसभा ही गाजवणारच… असे संकेत जयश्रीताई पुंडकर यांच्याकडून व्यक्त होताना दिसतात..

एवढेच नव्हे तर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर अशा दिग्गज नेत्यांच्या तालमीत तयार झालेले व जिल्हा कार्यकारिणी वर पकड असलेले राजेश पाचडे यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे मुंबई व विशेषता दिल्लीत वर्चस्व निर्माण करणारे प्रबळ व वजनदार नेते यांनी राजेश पाचडे यांना संधी देण्याची आग्रही भूमिका अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती आहे..

राजेश पाचडे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झालेल्या असून त्यांची उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी असल्याचे स्पष्ट संकेत आहेत..राजेश पाचडे हे व्यक्तिमत्व सर्वमान्य असून यांच्या उमेदवारीला दिल्ली दरबारी झुकते माप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.. तरी आ. भारसाकळे यांच्यावर कार्यकर्तेच नव्हे तर जनतेमधून सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेत नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.. अशा चर्चा कनक कोटक यांच्या पारिवारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या गोटात सुरू आहेत.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आ.प्रकाश भारसाकळे यांचे तिकीट कापून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलेले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish