INDIA NEWS

Press

स्टेट बँक ऑफ इंडिया चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..ग्राहकांच्या पैशाची सुरक्षा बेवडा मॅनेजर करेल का ? बँकेच्या विश्वास आर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित..

salim Khan 24 August 2024

अकोली जहागीर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चा ब्रांच मॅनेजर प्रफुल डवरे

अकोट तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकोली जहागीर येथील शाखेतील मॅनेजर प्रफुल डवरे याने दारू पिऊन बँकेचे कामकाज चालू असताना भर दुपारीच ग्राहकांना शिवीगाळ ,आक्षेपार्ह वक्तव्य व अशोभनीय वर्तणूक केल्याची घटना काल दुपारी दि.२३ ऑगस्ट रोजी तीन वाजता अकोली जहागीर येथे घडली..

मध्यधुंद अवस्थेत असलेला अकोली जहागीर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चा बँक मॅनेजर प्रफुल डवरे

दुपारी तीन वाजता पासूनच बँकेच्या खातेधारकांना व महिलांना दारू पिऊन बेताल वक्तव्य करण्याचा प्रताप बँक मॅनेजर ने केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्वात महत्त्वाची असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया च्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले..

स्टेट बँकेच्या कोणत्याच शाखेत नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही.

बँक मॅनेजर विरुद्ध ग्रामस्थांची आक्रमकता

सतत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. गोरगरिबांना व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धां तासंतास लाईन मध्ये उभे करून रडकुंडीला आणून कंटाळून परत जाण्याची वेळ सुद्धा बँक कर्मचारी हमखास आणतातच लंच टाईम च्या वेळी कितीही गर्दी असली तरीही अक्षरशःसर्व व्यवहार स्थगित करण्यात येतात..स्टेट बँक ऑफ इंडिया ला खातेधारकांची किंवा त्यांच्या पैशांची, ठेवींची गरज नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अहंकार रुपी बोलण्याच्या पद्धतीला सर्व जनता कंटाळलेली आहे..

सेवेतून बडतर्फ कमी करण्याची ग्रामस्थांची मागणी..

तसेच ग्राहकांचाच पैसा असून त्यालाच चोरासारखी वागणूक मिळत असल्याने हा सर्व घाणेरडा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे..त्यामध्ये दारू पिऊन ऑन ड्युटी मॅनेजरने धिंगाणा घातल्यामुळे अकोली जहागीर येथील जनतेचे आक्रमक स्वरूप मॅनेजर प्रफुल डवरे यांने बघितले आहे..

सोबतच डवरे यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी आलेले अकोला येथील स्टेट बँकेचे विभाग प्रमुख राधेश्याम चिराणीया यांनी सुद्धा जनतेचा संतप्त राग जवळून बघितला व परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर मॅनेजर प्रफुल डवरे याला अकोट ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले तसेच अशा विकृत मानसिकतेच्या मॅनेजरला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी राधेश्याम चिरानिया यांना अकोली जहागीर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

बँक मॅनेजर हा बेवडा व विकृत स्वरूपाचा असल्याचा प्रतिक्रिया..

यादरम्यान या सर्व घडामोडी पाहता स्टेट बँकेमध्ये जनतेचा पैसा हा सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.. एवढ्या महत्त्वाच्या मुख्य पदावर बेवड्या कर्मचाऱ्यांची नेमणूक होतेच कशी.. स्टेट बँक ही खातेधारकांच्या पैशासंबंधीत गंभीर नाही का ? ग्राहकांच्या पैशाची सुरक्षा बेवडा बँक मॅनेजर करेल का ? स्टेट बँकेवर कितपत विश्वास ठेवायचा..असे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित झाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा स्टेट बँकेची विश्वास अर्हता जनतेमध्ये कमी झाली असल्याचे बोलले जाते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish