इरफानभाई सरदेशमुख यांची विदर्भ पटवारी संघ नागपुर -उपविभाग अकोट च्या अध्यक्षपदी नियुक्ती..
RaviRaj 14 Feb 2023
अकोट : नुकत्याच झालेल्या विदर्भ पटवारी संघ नागपूर यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सह अकोला जिल्ह्यातील अकोट येथील उपविभाग शाखेची कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये आपल्या कार्याची ओळख संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण करणारे व मागील 37 वर्षापासून अविरत आपले कर्तव्य बजावत असलेले इरफानभाई सर देशमुख अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष शिलानंद तेलगोटे, प्रवीण गील्ले सचिव व सहसचिव संतोष देसले तसेच कोषाध्यक्षपदी राजेश जी बोकाडे यांची नियुक्ती झाली.
विदर्भ पटवारी संघ नागपूर यांनी इरफान भाई सरदेशमुख यांचा संघटनात्मक अनुभव व सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्यावर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी देऊन नवनिर्वाचित सर्व कार्यकारिणी च्या माध्यमातून विदर्भ पटवारी संघ नागपूर यांनी एक प्रकारे सरदेशमुख यांनी केलेल्या कार्याची पावती देत दखल घेतली आहे ..
त्यामुळे अकोट तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून सरदेशमुख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.. इरफान भाई सरदेशमुख यांनी विदर्भ पटवारी संघ नागपूर यांचे व सर्व नवनिर्वाचित सहकारी यांचे आभार मानले..