जागृती उच्च माध्यमिक विद्यालयाची भरघोस यशाची परंपरा कायम!गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण-ज्ञानदेव मांडवे
Dnydeo mandve 27 may 2023
अकोला: शहराच्या मध्यभागी व उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या रणपिसे नगर येथील जागृती उच्च माध्यमिक विद्यालय मागील गेली कित्येक वर्षापासून शहरातील अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे अतिशय मोलाचे कार्य करीत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा
फेब्रुवारी परीक्षा 2023 चा निकाल तिन्ही विभागाचा अभूत पूर्व लागलेला दिसत आहे त्यामध्ये विज्ञान विभाग 96.77% तर कला विभाग 64.58% असून उच्च माध्यमिक (M.C.V.C.) विभाग 86.54% लागला व
उज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही जागृती विद्यालयाच्या तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवलेले आहे चि. प्रज्वल प्रभाकर बानाईत 85 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच कला विभागात कु. दिव्या ज्ञानेश्वर इंगळे हिने 83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर MCVC विभागातून कु. वैष्णवी प्रशांत वानखडे हिने 64 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये खूप कौतुक होत आहे
जागृती विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक वृंद व संस्थेचे पदाधिकारी अध्यक्षा मा. सौ. शांताताई धानोरकर सचिव ॲड. श्री. विलास भाऊ वखरे, मुख्याध्यापक श्री. अरुण राऊत सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून अभिनंदन केले. व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच mcvc विभागाचे व इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा ज्ञानदेव मांडवे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच जागृती विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन अतिशय मौलाचा दगड ठरले आहे अशी भावना गुणवंत विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे…