INDIA NEWS

Press

जळगाव जिल्ह्यातील भेंडवळ बुद्रुक येथे रस्ता रोको आंदोलन..मराठा समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात भेंडवळवासी आक्रमक..

parmeshwar hatole 3 Sept 2023

रास्ता रोको करून मराठा बांधवांवर लाठीचार्ज झाल्याच्या निषेध व्यक्त करताना भेंडवळवाशी

आज दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी जालना येथील अंतरवाली येथे मराठा समाजातील शेकडो लोकांवर झालेल्या पोलिसांनी केलेला लाठी चार्ज हल्ल्याबाबत निषेध म्हणून जळगाव जिल्ह्यातील भेंडवळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामध्ये तसेच मराठा समाजावर महाराष्ट्र सरकारच्या वेळ काढू पणाच्या धोरणामुळे खूप अन्याय होत आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील मराठा समाज उठून पेटला आहे त्याचा वेग घेत भेंडवळ येथील मराठा समाजाचे नागरिकांनी आपला आक्रोश दाखवत भेंडवळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सलग एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू असताना त्यादरम्यान पोलीस प्रशासन जळगाव जामोद यांनी गावातील नागरिकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये याकरिता मराठा समाजाने सामंजस्याची भावना ठेवून आंदोलन थांबवण्यात आले व पुन्हा एकदा त्यानिमित्ताने मराठा बांधवांनी मोठे मन दाखवून चांगल्या संस्काराचे दर्शन घडवले..

या आंदोलनांमध्ये मध्ये मराठा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भागवत भाऊ अवचार व ठाकरे गटाचे भेंडवळ शाखाध्यक्ष बाळू वाघ, राष्ट्रवादीचे प्रमोद भाऊ सपकाळ, भाजप पक्षाचे कार्यकर्ते पंजाब भाऊ वाघ माजी सरपंच तुकाराम पाटील , वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळूभाऊ जाधव, ठाकरे गटाचे तडफदार कार्यकर्ते अण्णा वाघ, छोटू वाघ, उद्धव वाघ व गावातील समस्त मराठा समाज व
महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते वरील सर्व घटनाक्रम पाहता जळगाव जिल्ह्यातील भेंडवळ वासियांनी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाचे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित करून दिले आहे व त्याकरिता गरज पडल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी संपूर्ण भेंडवळ वाशीयांनी आक्रमक पवित्रा घेत व्यक्त केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish