जिल्ह्यातून अनेक अल्पवयीन मुली होतायेत गायब.! शोध मोहीमची बिकट वाट, आणि पोलिसांकडून टाइमपास..
RaviRaj 25 Feb 2025

अकोला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, तपास यंत्रणा हतबल
अकोला जिल्ह्यातून दर आठवड्याला महिन्याला अनेक अल्पवयीन मुली घरातून निघून जात आहेत तर अचानक गायब होत आहेत तर कुणी फूस लावून पळवून नेत आहेत त्यामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शिर्ला अंधारे या गावातील अल्पवयीन मुलगी घरात घुसून एका युवकाने जबरदस्तीने उचलून नेली दोन महिन्यापासून अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी पातुर पोलिसांकडे धाव घेतली असता अजून पर्यंत सुद्धा मुलीचा शोध मात्र पोलीस घेऊ शकले नाही मुलीच्या आई वडिलांनी वारंवार पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी दिल्या परंतु पोलिसांकडून शून्य प्रतिसाद देण्यात आला.

त्यासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच असलेले खदान पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा अशीच घटना घडली शिकवणीला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला एका अंजली नामक महिलेने उचलून नेल्याची घटना घडली खदान पोलिसांच्या नाकावर टिचून पीडित मुलीने फोनवर आई-वडिलांना संपर्क केला असता परिचित असलेली अंजली मावशी यांच्यासोबत असल्याचे मुलीने सांगितले तरीसुद्धा खदान पोलीस हा तपास लावू शकले नाहीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील रॅकेट उघडकीस आणणारे अकोला पोलीस मात्र मुलींचा शोध घेण्यास हतबल असल्याचे जाणवते

पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पाठीमागूनच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिविल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एक अल्पवयीन मुलगा गायब झाल्याची घटना ताजी आहे त्यामुळे पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांच्या कार्यपद्धतीवर हा कायम प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे कायदा व सुव्यवस्था फक्त गोरगरिबांवर अन्याय करण्यासाठीच पोलिसांकडून वापरला जातो अन्यथा एवढ्या मोठ्या स्वरूपात जिल्ह्यातील मुली गायब होत आहेत हा खूप मोठा गंभीर प्रकार असून याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष आहे

अकोला जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील असलेले अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अंतर्गत असलेल्या दहीहंडा पोलीस स्टेशन यांचा मात्र इतिहासच वेगळा आहे सर्व अवैध धंदे हे पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या आवारातच कायम बघायला मिळतात कोणत्याही स्वरूपाच्या कारवाई करा तरीही अवैध धंदे मात्र हे कायम आहेतच मागील पंधरा दिवसापासून दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुटासा गावातील एक अल्पवयीन मुलगी सकाळी पाच वाजता अचानक गायब झाली तरीसुद्धा दहीहंडा पोलीस आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करू शकले नाही मुलीचा शोध घेण्यास पोलीस गंभीर दिसत नाहीत त्यामुळे नेहमीप्रमाणे मुलगी गायब झाल्यास मुलगी प्रियकरा सोबत पळून गेली असे गृहीत धरून स्वतःच न्यायपालिकेप्रमाणे निर्णय देऊन टाकतात कोणतीही शहानिशा न करता आणखी कामाचा ताण वाढू नये याकरिता गायब झालेले मुलींच्या पालकांनाच मुलगी आपोआप घरी येईल असे समजावून सांगतात परंतु कायद्याप्रमाणे मुलगी ही अल्पवयीन असेल तर तिला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही किंवा ती असं काही कृत्य करण्यासाठी सक्षम नाही तिचा हा निर्णय कायद्याप्रमाणे गृहीत धरता येत नाही त्यामुळे तात्काळ पोलिसांनी मुलींचा शोध घेऊन पळून नेणाऱ्यावर पोस्को कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून अटक करावी परंतु पोलीस ही कठोर भूमिका न घेता घरून निघून गेलेल्या मुली ह्या सज्ञान होण्याची वाट पाहतात आणि एकदा मुली सज्ञान झाल्या की त्यांना कायद्यानुसार सर्व अधिकार प्राप्त होऊन मुलींचे निर्णय हे ग्राह्य धरण्यात येतात म्हणजेच पोलिसांचे काम हे कमी होऊन आपोआप कायद्याच्या चौकटीत बसून केला जातो

अशी परंपरा अकोला पोलिसांनी सुरू केली आहे त्यानंतर मुलींना पश्चाताप झाला तरी भावनिक होऊन अशा मुली आपले खडतर का होईना आयुष्य स्विकारतात हीच काळजी या अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांना असते पालकांच्या या दुःखद भावना समजून तरी पोलिसांनी या मुलींचा शोध घेऊन तात्काळ आरोपींना पोलिसांच्या खाकीचा कठोर अनुभव द्यावा व अकोला पोलिसांचे अस्तित्व फक्त अवैध धंद्यातून हप्ते खोरीसाठीच नव्हे तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला शोधण्यासाठी तरी थोडेफार दिसावे अशा भावना अनेक पालकांकडून व्यक्त होत असून अकोला जिल्ह्यातील पोलीस मुलींचा शोध घेण्यास हतबल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले..