INDIA NEWS

Press

वरली किंग राजेश साळुंके च्या मैत्री ने केला घात, अन् एसीबी अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात..

salim Khan 25 September 2025

“कस्टडी डेथ” हरमकर मृत्यू प्रकरणाने घेतला नाही धडा..एसीबी सह पोलीस अधिक्षक लावणार का गंभीर प्रकाराचा छडा..

Akot : ३ सप्टेंबर रोजी सांगळुद फाट्यावर झालेल्या अपघातात धडकलेली डिझायर गाडी व नंबर पाहून संपूर्ण जनतेला आता गाडीची ओळख पटली आहे. गाडी कोणाची, ती कुणाकडे वापरात होती याचा अंदाज जनतेला स्पष्ट झाला असून त्यामुळे संबंधित अधिकारी कोण आहे यावरही बोट ठेवले जात आहे.

अकोट कोर्टात साक्ष न झाल्याने दहा मिनिटात कोर्टाचे काम उरकून खाण्यापिण्याचा आनंद घेण्यासाठी वरली माफिया राजेश साळुंके सह काही पोलीस कर्मचारी मित्रमंडळी सोबत पोपटखेड येथील जंगल परिसरात अमरावती विभागात कार्यरत असलेले एसीबी अधिकारी गेले असता दारूचे अति सेवन झाल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली

दिवसभर मद्यपानाचा आनंद घेतल्यानंतर रात्री अकोट वरून अमरावती कडे परत जाताना सांगळुद फाट्यावर दारूच्या नशेत असलेल्या साहेबांची डिझायर गाडी लोखंडी पाईपला जोरदार धडकली हा गंभीर अपघात लपवण्याचा अतोनात प्रयत्न केल्या गेला या प्रयत्नामध्ये येवदा पोलीस तथा अकोट पोलिसांनी सुद्धा सहभाग घेतल्याचे दिसून येते मात्र हे गंभीर प्रकरण जनतेसमोर आणून पत्रकार रविराज मोरे यांनी पोलीस यंत्रणेसह एसीबी विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

नकली नोटा छापून चलनात आणणारा वरली माफिया राजेश साळुंके ज्याच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा अटृल गुन्हेगारासोबत ठाणेदार असताना या एसीबी अधिकाऱ्याचे संबंध प्रस्थापित झाले असल्याची धक्कादायक गंभीर बाब समोर आली असून आजही तीच घट्ट मैत्री कायम असल्याचे या प्रकरणावरून दिसून आले आहे

एसीबीसारख्या जबाबदार विभागातील अधिकारी अट्टल गुन्हेगारांशी सलगी ठेवतो ही बाब स्वतः विभागाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी ठरली आहे. या “मैत्रीपूर्ण” संबंधामध्ये नकली नोटा, माफियागिरी, काळा पैसा किंवा इतर गुन्ह्यांचे काही गुढ दडलेले तर नाही ना? असा संशय निर्माण झाला आहे त्यात आणखी भर म्हणजे, “कस्टडी डेथ” हरमकर प्रकरणात अजूनही एक पीएसआय व चार पोलीस जेलमध्ये सडत आहेत, तरीही पोलीस व एसीबी अधिकारी धडा घेत नाहीत.सततची गुन्हेगारी मानसिकता, गुन्हेगारांशी संगनमत आणि वरिष्ठांची मूकसंमती या त्रिसूत्रीने संपूर्ण पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, की पुन्हा दोषींना वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपले जाणार? अशी शंका उपस्थित केली जात आहे अपघातातील गाडीची ओळख आणि अधिकाऱ्यांचा उघड झालेला चेहरा लपवता येणार नाही. या संबंधातून दडलेले गुढ बाहेर आलेच पाहिजे अशा आक्रमक जनभावना समोर येत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish