कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह रशीद शाह याचे मानसिक संतुलन बिघडले!-पत्नीसह सर्व परिवारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी..
Sagar Lohiya. 15 March 2023
अकोट: मागील काही काळापासून अकोट शहरांमध्ये आसाम चे पडसाद उमटलेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह याच्या विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत परंतु या तक्रारींची शहर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे जाकीरशाह रशीद शाह याची हिंम्मत अजून वाढली आहे त्याचे रूपांतर खूप मोठ्या दादागिरी मध्ये झालेले आहे कुख्यात असलेला अकोट शहरातील दंगल मधील मुख्य आरोपी जाकीर शाह याच्या मुस्क्या आवळण्यात अकोट पोलीस अयशस्वी ठरले आहेत कारण जाकीर शाह रशीद शाह यांने 8 मार्च रोजी दोन वर्षापासून विभक्त व स्वतःच्या माहेरी राहत असलेली पत्नी व सासू सासरे साळा यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली व सर्व परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत सर्वांना खतम करून टाकेल अशा घातक धमक्या दिल्या अशा प्रकारची तक्रार जाकीर शाह विरुद्ध त्याच्या सासरच्या मंडळींनी दिली एवढ्यावरच न थांबता पुन्हा १० मार्च रोजी जाकीर शाह यांने राजीक शाह व रहीम शाह या दोन गुंड प्रवृत्तींना सोबत घेऊन स्वतःची भाची रुबीना परवीन हिच्या घरी जाऊन तीला व तिच्या पतीला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या पतीला सुद्धा खतम करून टाकण्याची घातक धमकी दिली त्यामुळे जाकीर शाह याचे सर्व नातेवाईक त्याच्या दहशतीखाली जगत आहे जाकीर शाह विरुद्ध मागील आठवड्यामध्ये सतत दोन परिवारांच्या तक्रारी झाल्या असून सुद्धा अजूनही जाकीर शाह याच्यावर कोणतीही प्रतिबंधक कार्यवाही अकोट शहर पोलिसांकडून झालेली दिसत नाही.
या प्रकरणांमध्ये पोलिसांची सामंजस्याची भूमिका दिसत असली तरी तक्रारदार परिवार शहरांमध्ये किती सुरक्षित आहेत व जाकीर शाह याची अजून किती दिवस दहशत कायम राहणार आहे असा प्रश्न जाकीर शाह विरोधातील प्रत्येक तक्रारदारांमध्ये निर्माण झाला आहे जाकीर शाह याच्या अशा असंतुलित वागण्यामुळे त्याचे मित्र नातेवाईक मंडळी भयभीत झाले आहेत.
जाकीर शाह यांने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच अकोट शहरातील अनेक महिला व गरीब लोकांना गंडा घालून अमीनपुरा मधील बांधकाम केलेले एकमेव राहते घर विकल्यामुळे व संपूर्ण कंगाल झाल्यामुळे जाकीर शाह याची मानसिकता ढासळली आहे त्याचे मानसिक संतुलन खराब झालेले आहे अशी शक्यता व चर्चा अमीनपुरा येथील जाकीर शाह चे जवळचे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यामध्ये होताना दिसत आहे तरी अशा घातक प्रवृत्तीचे शहरामध्ये वास्तव्य भयानक ठरू शकते तसेच समाजात सुद्धा अशा प्रवृत्तीचा वावर नसणे हे समाज हिताकरिता योग्यच असणार आहे याची तात्काळ दखल घेऊन पोलीस यंत्रणेकडून अशा घातक प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल का? की अजून मानसिक त्रास सहन करून एखाद्याची जीवित हानी होईल तोपर्यंत वाट बघावी लागेल अशा अनेक प्रकारच्या शंका व संभ्रम तक्रारदारांच्या मनात असून सोबतच पोलीस यंत्रणेवर विश्वास दाखवीत या प्रकरणाची दखल घेतल्या जाईल अशी काहींची अपेक्षा सुद्धा आहे यावर अकोट शहर पोलीस यंत्रणे कडून मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह याच्यावर कठोर कार्यवाही होईल का! की तक्रारदार परिवारांचे संरक्षण करण्यावर भर देऊन प्राधान्य देण्यात येईल हे पुढील काळात बघायला मिळेल…