कारगिल विजय दिवस निमित्त माजी सैनिक व शहिद यांच्या परिवारांचा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर कडून सन्मान..हा अकोला जिल्ह्याचा मान उंचवणारा क्षण-जया भारती-इंगोले
Raviraj 26 July 2023
Akola : तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी प्रस्तुत शहीदांचा सन्मान..
आज कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित शहीद आणि माजी सैनिक आणि यांच्या परिवारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन आळंदा येथील राजयोग मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने माजी सैनिक परिवार तसेच शहिदांचे परिवार सहभागी झाले होते. कारगिल युद्धामध्ये आपल्या प्राण्यांची आहुती देऊन आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शहिदांचा हा सन्मान सोहळा डॉ. सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. शहीद भास्कर राव पातोंड यांच्या राजयोग मंगल कार्यालय या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या सुनबाई सरपंच कोमल पातोंड (गाव देवळी) यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले. यावेळी सन्मान करत असताना डॉ. सुगत वाघमारे यांचे डोळे पाणावले होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक शहीद परिवार आपल्या शहिदांच्या आठवणीने भारावून गेले होते, उर भरून आलेला होता, तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि आठवणींना ओसंडून वाहण्यासाठी फक्त डोळ्यांचा मार्ग उरला होता..
कार्यक्रमाचे स्वरूप अगदी वेगळं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेची प्रतिमा आणि अमर जवान ज्योत यांचे पूजन करून सर्व शहिदांना एक मिनिट मौन धरून श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉ. सुगत वाघमारे आणि आजी-माजी सैनिक संघटनेच्या तसेच शहीद परिवारांच्या वतीने दीप प्रज्वलन करण्यात आले. कारगिल युद्धात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जे सैनिक शहीद झाले त्यांच्या परिवाराच्या सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली आणि अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा सन्मान सोहळा सुरू झाला. मधून मधून सेवन स्टार म्युझिकल ऑर्केस्ट्रा यांच्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. तसेच अनबीटेबल ग्रुप या डान्स ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. शेजारच्या परिवाराचा सन्मान करण्यापूर्वी शहीद झालेल्या सैनिकांची चित्रफित दाखवण्यात आली. शाल, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे या सत्काराचे स्वरूप होतं. तसेच शहीद आणि माजी सैनिकांच्या परिवारातील गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कारही यावेळी करण्यात आले त्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये कोणत्याच प्रकारचे भाषण नव्हते कारण, शब्दात व्यक्त न करणाऱ्या अशा भावना प्रत्येकाच्या मनात तरळत होत्या. आणि त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. गेल्या तीन वर्षांपासून आजी माजी सैनिक संघटना अकोला अंतर्गतच हा संपूर्ण सोहळा साजरा करायचे पण, या वर्षी तीक्ष्णगत संस्थेने पुढाकार घेऊन ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन स्वीकारले. विविध सैनिक संघटना या कार्यक्रमांमध्ये जूळल्या होत्या. कार्यक्रमानंतर सर्व शहीद परिवार तसेच आजी माजी सैनिकांसोबत सह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तीक्ष्णगत टिमने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे भावनिक आणि संवेदनशील सूत्रसंचालन जया भारती-इंगोले यांनी केले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन तीक्ष्णगत संस्थेचे सचिव मोंडोकार सर, एड. संजय सेंगर, एड.अनिता गुरव, श्रीकांत पिंजरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जया भारती, सुदन डोंगरे, विशाल नाईक, पवन कसबे, तेजरुप कुलकर्णी उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, अमित खांडेकर, विशाल शिंदे, विजय जामनिक, सिद्धार्थ शिरसाट, दिपाली बाहेकर, शरयू तळेगावकर, विद्या उंबरकर, सुचेति घोगरे, रोहित भाकरे, वैभव भदे , प्रतुल विर्घट, सनी वाळके, भावना डोंगरे, राहुल चोरपगार, राजेश मनवर, पद्माकर सदाशिव, हर्षाली गजभिये, शिल्पा डोंगरे तसेच संपूर्ण तीक्ष्णगत टीम ने अथक परिश्रम घेतले.