कथा वाचनाला आला अन् यजमानाच्या बायकोलाच घेऊन पळाला;-धीरेंद्र आचार्य यांच्या शिष्याचा पराक्रम..
manish Rao 9 May 2023
पती राहुलचा आरोप आहे की, कथेदरम्यान त्याच्या पत्नीला नरोत्तम दास दुबे याने त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन दोघांनी बोलणे सुरू केले.
भोपाळ : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये रामकथेचे (Ramkatha) आयोजन करणे, एका इसमाला चांगलेच महागात पडले आहे. रामकथा ऐकता ऐकता त्याला त्याची पत्नीच (wife) गमवावी लागली. झालं असं की रामकथा वाचायला आलेल्या कथाकाराच्या शिष्याने यजमानाच्या पत्नीलाच (katha wachk eloeped with yajman wife) पळवून नेले. याप्रकरणी पीडितेच्या पतीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी महिला हरवल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्या महिलेचा शोधही सुरू केला. महिन्याभरानंतर जेव्हा फिर्यादीची पत्नी सापडली, तेव्हा पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून जबाब घेतला. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तेव्हा त्या महिलेने पतीसोबत राहण्यास सरळ नकार दिला. चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबतच आपल्याला रहाये आहे, अशी इच्छा त्या महिलेने व्यक्त केली.
खरंतर, या प्रकरणाची सुरुवात 2021 पासून झाली. जेव्हा महिलेचे पती राहुल तिवारी यांनी गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते. चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी बोलावण्यात आले. आचार्य त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबत रामकथेचे वाचन करण्यासाठी आले होते.
या प्रकरणी पती राहुल यांनी असा आरोप केला आहे की, कथा वाचनादरम्यान त्यांच्या पत्नीला नरोत्तम दास दुबे याने त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आणि त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन दोघांनी बोलणे सुरू केले. 5 एप्रिल रोजी नरोत्तमने राहूल यांच्या पत्नीला पळवून नेले.
या प्रकरणी जिल्ह्याचे एसपी अमित सांघी सांगतात की, वादामुळे महिलेला पतीसोबत राहायचे नव्हते, त्यामुळे कोणतीही केस दाखल होऊ शकत नाही. पण तरीही पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.