INDIA NEWS

Press

खामगावचे नितीन डीडवाणीया सारख्या व्यक्तिमत्वाची गरज..पूरग्रस्त परिवारांना दिले प्रत्येकी 5100 रुपये-पुढील पिढीला प्रेरणादायी आदर्श..

parmeshwar hatole 29 July 2023

खामगाव येथील सेवाभावी नितीन रमेशचंद्र डिडवानिया यांनी पूरग्रस्त भागातील जमीनदोस्त झालेल्या कुटुंबांना दिला आहे..
रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या प्रेरणेतून तर आई-वडिलांच्या आशीर्वादाने नितीन डीडवाणीया यांनी जळगाव जामोद तालुक्यातील सहा गावांमधील 51 जणांना प्रत्येकी 5100 रुपयांची नगद राशी देऊन सहकार्य केले..
मडाखेळ खुर्द ,वडशिंगी, परशरामपुर ,वडगाव पाटण सावरगाव व अकोला खुर्द या गावातील अत्यंत गरज असलेल्या निवडक कुटुंबाला त्यांनी ही मदत दिली आहे
एकाच रात्री पावसाने कहर करून या भागातील नागरिकांचे घर उद्ध्वस्त केले…

यामध्ये अन्नधान्यांपासून कपड्यालत्त्या त्यांपर्यंत काहीच शिल्लक उरले नाही या पूरग्रस्तांची दयनीय अवस्था पाहता या दरम्यान नितीन डीडवानिया यांनी स्वतः मित्रपरिवारासह सर्व पूरग्रस्त भाग पिंजून काढला. व अत्यंत गरज असलेल्या कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून आर्थिक तरतुदीचे नियोजन केले. आणि
आज विख्यात हरिभक्त परायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या उपस्थितीत डीडवानिया यांनी 51 परिवाराला प्रत्येकी 5100 रु. प्रत्यक्ष आर्थिक मदत केली. व ही सर्व मदत त्यांनी फक्त निस्वार्थ सेवा या उद्देशाने केली त्यामुळे मदत झालेल्या 51 पूरग्रस्त कुटुंबांनी डीडवाणीया यांचे मनापासून आभार मानले व आजच्या धकाधकीच्या काळात कठोर, निर्दयी मानसिकता असलेल्या लोकांमध्ये असा एक देव माणूस असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish