लाखो भक्तांनी दुमदुमली विदर्भाची पंढरी-संस्थानचे सर्वेसर्वा निळू पाटील गणेश यांच्या हस्ते लाखो भक्तांच्या उपस्थितीत महापूजा व थेट प्रक्षेपण..
RaviRaj 26 May 2023
दरवर्षीप्रमाणे मागील अनादी काळापासून ऐतिहासिक व परंपरागत चालत आलेल्या विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक लाखो भक्तांची उपस्थिती लाभली.
शेगाव : आज सकाळी सात वाजता शेगाव संस्थानचे सर्वेसर्वा निळू पाटील गणेश यांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी चे महापूजन झाले व अनेक भक्तांनी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेतला शेगाव येथून आज पालखी श्री संत गजानन महाराजांच्या नामाच्या गजरात निघाली असून नागझरी मार्गे पारस अकोला येथून पंढरपूरला जाणार आहे या पालखी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व श्रींचे दर्शन आपणांसमोर आम्ही घेऊन आलो आहे. तरी हा भव्य दिव्य सोहळा आमच्या इंडिया न्यूज च्या माध्यमातून सर्व भक्तांसाठी उपलब्ध करून देत आहोत या भक्तिमय वातावरणाचा आनंद द्विगणित होऊन शेगाव नगरीच्या माध्यमातून आपल्या विदर्भाची पंढरी व महाराष्ट्रातील सर्वोच्च व्यवस्थापन असलेले संस्थान आपल्या विदर्भामध्ये आहे हे आमचे भाग्य आहे अशी भावना श्री गजानन महाराजांच्या भक्तांकडून व्यक्त होत आहे..