मुंबई महापालिकेने केला चांदिवली येथील हॉटेल मालकांवर अन्याय.. शेकडोच्या संख्येने कर्मचारी, कामगारांकडून आझाद मैदान वर उपोषण
परमेश्वर पाटील 25 April 2025
मुंबई महापालिकेने केला चांदीवली येथील हॉटेल मालकांवर अन्याय..
आझाद मैदान मुंबई येथे शेकडोच्या संख्येने आमरण उपोषण
विद्यमान आमदाराच्या घरासमोर खाली बजाओ आंदोलन करणार
मुंबई
मागील अनादी काळापासून मुंबई येथील चांदिवली भागात अनेक लॉजिंग बोर्डिंग उभे आहेत त्यामध्ये अचानक महानगरपालिका यांनी हे चाळीस वर्षापासून उभे असलेले लॉजिंग बोर्डिंग गैर कायदेशीर ठरवले व सोबतच तोडक कारवाई सुरू केली अनेक हॉटेल बांधकामे महानगरपालिकेने जमीन दोस्त केली यापुढेही अजून कारवाई करणार त्याकरिता न्यायालयाकडे हॉटेल मालकांनी धाव घेऊन स्थगिती आणली आहे परंतु कायमस्वरूपी हा विषय निकाली लागण्यासाठी हॉटेल मालक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत यामध्ये कर्मचारी सह महिला कामसुद्धाद्धा उपोषणाला बसलेले आहेत मागील पंधरा दिवसापासून हे उपोषण सतत सुरू आहे
या प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास चांदीवली क्षेत्रातील विद्यमान आमदार लांडे यांच्या घरासमोर थाली बजावो आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा उपोषण कर्ते यांनी दिला आहे मागील चाळीस वर्षापासून महानगरपालिकेने सर्व प्रकारचे कर या हॉटेल मालकांपासून घेतले आहे त्यावेळी हे हॉटेल बांधकाम गैर कायदेशीर नव्हते का? असा प्रश्न उपोषण कर्ते यांनी राज्य शासनाला विचारला आहे मुंबईमधील 90% बांधकामे हे गैर कायदेशीर असल्याचे सुद्धा गंभीर आरोप महानगरपालिका यांच्यावर उपोषण कर्ते यांनी केले आहेत हॉटेल व्यवसायिक यांच्यासह कर्मचारी महिला कामगार यांचा परिवार रस्त्यावर आला असून उपासमारीची वेळ महानगरपालिका प्रशासनाने या सर्व कुटुंबांवर आणलेली आहे
त्यामुळे शेकडोच्या संख्येने उपोषण कर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती आहे तरी तात्काळ कायमस्वरूपी या गंभीर प्रकरणावर तोडगा काढून राज्य शासन व महानगरपालिका प्रशासन यांनी या हॉटेल व्यवसायिक व कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेऊन उपोषणाची सांगता करावी असे आवाहन संपूर्ण लॉजिंग बोर्डिंग व्यावसायिक यांच्याकडून देण्यात आले आहे