मुंबई व संसद दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालय स्थापन व्हावे.. धनंजय पाटील काकडे.
केंद्र व राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांचे विरोधी कायदे नष्ट करण्यासाठी मुंबई व संसद दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र शेतकरी मंत्रालय स्थापन होण्या करीता पांडुरंगाला साकडे घालण्यात आले.
– धनंजय पाटील काकडे.
Raviraj 13 Nov 2022
देहू ते पंढरपूर( व्हाया नागपूर विदर्भातून) जाणारी ही शेतकरी वारकरी कष्टकरी महासंघाची दिंडी पंढरपूर येथे समारोप होणार आहे. शेतकरी संघटनेचे समन्वय समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील काकडे व अध्यक्ष श्री भगवान जी बोराडे पंढरपूरला शेतकरी वारकरी कष्टकरी दिंडीचे समारोपाची पूर्व तयारीची त्यांनी पाहणी केली. दि. 12 नोव्हेंबर 2022 ला सकाळी सात वाजता चंद्रभागा नदीचे तीर्थस्नान करून, पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले असतं चंद्रभागाच्या पात्रात शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील काकडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना न्याय व हक्कासाठी ही लढाई पांडुरंगाच्या कृपेने पूर्णत्वास जाईल असा मनोदय व्यक्त केला.
शेतकरी कष्टकरी व वारकरी या या शोषित वर्गाचे शोषण थांबण्यासाठी शेतकरी वारकरी कष्टकरी जागर दिंडी संपूर्ण महाराष्ट्रातून फिरून पंढरपुरात येईल . आम्हीच आमच्या हाताने शिक्के मारून भ्रष्टाचारी राक्षसांना निवडून पाठविल्यामुळे आमचीच कुऱ्हाड आमच्या पायावर कोसळली परंतु आता आम्ही जागे झालो आहे. सत्तेतून हाकलण्यासाठी पांडुरंगाच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रात जागर दिंडी फिरणार आहे .आपण सर्व जनतेने या दिंडीला आर्थिक सहकार्य करून जास्तीत जास्त विधान भवन संसद मध्ये या शोषित वर्गाचे आमदार ,खासदार प्रतिनिधी म्हणून पाठवावे तसेच न्याय हक्कासाठी व शेतकरी वर्गाचे विरोधी कायदे नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यां साठी स्वतंत्र मंत्रालय असावे ‘शेतकरी मंत्रालय” एवढीच पांडुरंग चरणी विनंती केली. चंद्रभागा नदीच्या पात्रातून जात असताना त्यांनी ” इडा पिडा टळणार आहे, बळीच राज्य येणार आहे.” असा पांडुरंगाला मनोदय व्यक्त केला.