INDIA NEWS

Press

मुंबई: वेदांता प्रकरणी युवराज तोंडावर आपटले…

Ravi Raj 26 spt 2022

मुंबई : वेदांता प्रकरणी महाविकास आघाडी तोंडावर आपटली आहे. महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि हजारो युवकांना मिळणार रोजगार युती सरकारच्या धोरणामुळे गेल्याचा आरोप महाविकास आघाडी कडून सातत्याने केला जात होता

युवराज आदित्य ठाकरे

याबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून खुलासा करण्यात आला आहे. सत्ताधारी शिवसेना भाजप रिपाइं युतीच्या माध्यमातून वडगांव येथे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ही बाब एमआयडीसीकडून समोर आली आहे.

एमआयडीसीचा महत्त्वपूर्ण खुलासा

एमआयडीसीने एक पत्रक काढून याबाबत खुलासा केला आहे. आपल्या पत्रकात एमआयडीसीने म्हटले की, ‘वेदांता फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा अद्याप पर्यंत कुठलाही करार झालेला नाही. तसेच कुठलाही करार न झाल्यामुळे वेदांता फॉक्सकॉनला महामंडळाकडून कुठल्याही भूखंडाचे वाटप देखील करण्यात आलेले नाही. म्हणून याबाबत अधिक माहिती देता येणार नाही,’ असा महत्त्वपूर्ण खुलासा एमआयडीसीने आपल्या पत्रात केला आहे. त्यामुळे वेदांता प्रकरणी युती सरकारवर आरोप करणारी महाविकास आघाडी तोंडावर आपटली आहेत.

आदित्य ठाकरेंचे फडणवीस शिंदेंवर आरोप

माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांसह काही दिवसांपूर्वी पुण्याच्या तळेगांव येथे आंदोलन केले होते. वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी भाजप आणि शिंदे सरकार जबाबदार आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी फडणवीस शिंदे सरकारवर केला होता.

अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

वेदांता प्रकल्पासाठी मविआ सरकारने MOU केला नव्हता, ना जमीन दिली होती. प्रकल्प गेल्यावरून जे लोक खोटारडे आंदोलन करीत आहेत, त्यांचा खोटारडेपणा उघड झाला. आता इव्हेंट मॅनेजमेंट बंद करून महाराष्ट्राची माफी मागा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ.

– आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish