महिला बाल विकास विभाग खातोय शासनाची भाकरी अन् भ्रष्टाचार लपवण्यासाठी करतोय सायं दैनिकाची चाकरी..
Salim Khan 27 May 2024

महिला बाल विकास विभागाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार उघड
कंत्राटदारावर नामांकित सायं दैनिकाचा हात
अंगणवाडी सेविका अनभिज्ञ मात्र भ्रष्टाचाराची चौकशी होणार
देशाचे भविष्य असलेले बालगोपाल यांच्याकरिता अंगणवाड्यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना केंद्र व राज्य शासनाकडून राबवल्या जातात त्यापैकीच एका योजनेच्या माध्यमातून 2024- 25 या वर्षात महाराष्ट्रातील 11740 अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता पाण्याची टाकी बसवून बालकांच्या आरोग्यासाठी पिण्याकरिता चांगले पाणी मिळावे हा उद्देश ठेवून शासन 19,95,8000 करोड खर्च करीत आहे

हा निधी केंद्र 60% व राज्य शासनाचा 40% असून प्रत्येक अंगणवाडी सेविकेच्या खात्यामध्ये 17 हजार रुपये थेट देण्यात आले आहेत या पैशाचे विनियोजन हे स्वतः अंगणवाडी सेविका यांनी नियमानुसार करणे अपेक्षित होते टाकी बसवून नळ कनेक्शन घेऊन भविष्यात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याचे भान ठेवून ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांना असल्याचे शासन निर्णयानुसार निदर्शनास येते म्हणूनच थेट अंगणवाडी सेविकेच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत परंतु अचानक महिला बाल विकास विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहे याचा कोणताही लेखी करारनामा जिल्हा परिषद मधील महिला बाल विकास विभागाकडे उपलब्ध नाही तरीसुद्धा वरिष्ठांनी हे कंत्राटदार प्रत्येक सेविकांवर का लादले असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे

अनेक अंगणवाड्यांमध्ये टाकी बसवण्याचे काम हे निकृष्ट झाल्याचीही ओरड आहे तर काही सेविका या कंत्राटदाराच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत हा सगळा गोंधळ अदृश्य होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झाला आहे या सर्व कामाची योग्य चौकशी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविका राहतील व करोडो रुपयांचा झालेला भ्रष्टाचार हा सेविकांकडून वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे अंगणवाडी सेविका यांना कार्यालयाकडून कोणताही लेखी आदेश नसताना थोपलेला कंत्राटदार हर्षल ताथोड यांच्याकडूनच काम करून घेण्याचा वरिष्ठांकडून दबाव आहे असे अंगणवाडी सेविकांनी बोलून दाखवले

अंगणवाडी सेविका यांच्या खात्यात थेट पैसे आल्याने या खर्चाची सर्व जबाबदारी सेविका यांची आहे परंतु वरिष्ठांच्या तोंडी आदेशामुळे सेविकांनी हे निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदारांकडून करून घेतले आहे व त्यासंबंधीचे लेखी ना हरकत सुद्धा सेविकांनी देऊन टाकले आहे परंतु या निकृष्ट कामाची तसेच झालेल्या करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे यामध्ये सीडीपीओ किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कोणतेही लेखी आदेश नसल्यामुळे या भ्रष्टाचाराची जबाबदारी अंगणवाडी सेविका यांच्यावर निश्चित करण्यात येण्याची दाट शक्यता असून सेविकांना मात्र या कार्यावाहीला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे सोबतच शासनाची फसवणूक व दिशाभूल केल्यामुळे कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त मुंबई यांनी दिली आहे

त्यामुळे टाकी बसवण्याचे काम हे कोणाकडून करून घ्यायचे हा अधिकार फक्त सेविकांनाच असल्यामुळे थोपवलेल्या कंत्राट दाराकडूनच काम करून घ्या असा कोणताही लेखी आदेश वरिष्ठांचा नसल्यामुळे अंगणवाडी सेविका मात्र पुरत्या फसल्या आहेत सेविकांनी मनमानी कारभार करीत कोणत्याही कायदे तज्ञाची सल्ला न घेता वरिष्ठांवर आंधळा विश्वास ठेवून पायावर दगड मारून घेतला आहे त्यामुळे पुढील काळात हा भ्रष्टाचार कोणते वळण घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल..

प्रतिक्रिया
पिण्याच्या पाण्याच्या टाकी बसवण्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे जवळपास प्रत्येक टाकी मागे 5000 ते 7000 च्या दरम्यान हा खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे परंतु आम्हाला संपूर्ण 17 हजार रुपये कंत्राटदाराला देण्यासाठी वरिष्ठांकडून नियमित दबाव आणल्या जात आहे टाकी बसवण्याच्या खर्चाचा हिशोब मागितल्यास कंत्राटदार हा टाळाटाळ करीत असून संपूर्ण 17 हजार रुपये न दिल्यास कंत्राटदार व त्याच्या माणसांकडून आम्हाला सतत धमक्या सुद्धा मिळत आहेत
अंगणवाडी सेविका अकोट विभाग