महाराष्ट्र राज्य एच एस सी व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांची कार्यकारणी जाहीर..सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण-आयोजक ज्ञानदेव मांडवे यांचे सर्वत्र कौतुक..
parmeshwar hatole 3 sept 2023
शेगाव: येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये दि.२ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य एच एस सी व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांची कार्यकारणी जाहीर झाली त्यामध्ये पुन्हा एकदा अध्यक्षपदावर मिलिंद सोनकांबळे यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदावर रमेश सावकारे, अरुण कांगणे सचिव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्य पदांवर रवींद्र दहाट, संजय सानप, ज्ञानदेव मांडवे, नंदू ढेंगे, विजय जहरकर, प्रदीप दिवेकर व महिला प्रतिनिधी म्हणून सौ मंगला सोनवणे यांना सुद्धा नुकत्याच झालेल्या कार्यकारणी मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली त्यासोबतच नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
मागील अनेक काळापासून ही संघटना तांत्रिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी लढा देण्याचे काम सदैव करत आलेली आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांना मुख्य असलेल्या मागण्या पूर्णत्वास नेण्याचे काम या संघटनेकडून अनेकांच्या प्रयत्नातून यशस्वी झालेले आहेत. मागील कोरोनाच्या काळापासून ही संघटना सक्रिय होत नसल्यामुळे जागृती विद्यालय अकोला येथील ज्ञानदेव मांडवे यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना व सभासदांना एकत्र आणून शेगाव येथे खूप मोठ्या स्वरूपात चर्चासत्र सभेचे आयोजन घडवून आणले यापूर्वी संघटनेची अशा प्रकारची एकत्रित सभा 2017 मध्ये संपन्न झाली होती तेव्हापासून सर्व कामकाज व एकमेकांशी संभाषण फक्त मोबाईल द्वारे होत असल्याने कामकाजाचा वेग हा खूप कमी झाला होता त्याचा परिणाम म्हणून या दरम्यानच्या काळात संघटनेची कोणतीही मागणी पूर्णत्वास गेली नाही ..
परंतु आज ज्ञानदेव मांडवे यांनी एक अभूतपूर्व प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे व त्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यातील सभासदांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 500 च्या वर पदाधिकारी व सभासद यांनी शेगाव येथे संघटनेच्या सभेला उपस्थिती दर्शवली यामध्ये अनेक महिला प्रतिनिधींचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यामध्ये संघटनेतील सर्वांना एकत्र आणून चर्चासत्र घडवून अनेकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली .. शासन दरबारी अनेक प्रमुख मागण्या येणाऱ्या काळात आग्रही भूमिका घेऊन संघटना सामोरे जाणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सोनकांबळे यांनी दिली आहे तसेच संघटनेतील पदाधिकारी व सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून ज्ञानदेव मांडवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे सर्व महाराष्ट्रातील तांत्रिक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आभार मानले व ही सभा ऐतिहासिक व सर्वांना स्फूर्ती देणारी ठरेल अशा भावना व्यक्त केल्या..