INDIA NEWS

Press

महाराष्ट्रातील बेरोजगारांना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता द्या!-ललित नगराळे यांची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रातून मागणी..

lalit nagrale 7 March 2023

समाजसेवक ललित नगराळे अकोलखेड

अकोट :
केंद्र व राज्य सरकार नोकऱ्यांच्या घोषणा करतात.मोजक्याचं जागा निघतात त्यामध्ये लाखो उमेदवार अर्ज करतात.मात्र बेरोजगार तरुण,तरुणींचा प्रश्न कायम राहतो.दिवसेंदिवस बेरोजगार तरुण,तरुणींची संख्या झपाट्याने वाढत आहे.युपीएससी, एमपीएससी,बॅंक,रेल्वे,पोलिस भरती या क्षेत्रातील परीक्षांसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती केली जाते.त्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुण,तरुणींची संख्या ही मोठी आहे.त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी रोजगार मिळावा यासाठी ते धडपड करीत असतात.त्यामुळे छत्तीसगडमध्ये बेरोजगार तरुणांना महिन्याला २५०० रुपयांचा भत्ता मिळणार आहे.अशी घोषणा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली.

त्याच धरतीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील १८ ते ३५ वयोगटातील बेरोजगार तरुण,तरुणींना महिन्याला ३००० रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा करावी.अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष ललित प्रभाकर नगराळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रातून केली आहे.करुणेश मोहोड,योगेश काळे,अनुज सिरसाट,विपूल जवादे,सुजित सिरसाट यांनीसुध्दा मागणीला पाठिंबा दर्शविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish