INDIA NEWS

Press

 महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी..

RaviRaj 2 Jan 2023

ज्ञानेश्वर म्हात्रे

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील  विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत 20648 मते

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैद्य ठरली आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

हा शिक्षकांचा विजय, पेंशनचा प्रश्न सोडवणार : ज्ञानेश्वर म्हात्रे

ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफळ झाला आहे. रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे हा विजय सुकर झाला. हा शिक्षकांचा, 33 संघटनांचा विजय आहे. मला 20 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे. जो कोटा गरजेचा होता तो पहिल्याच फेरीत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजयानंतर दिली. “आझाद मैदानावर आंदोलनं करुन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन अनुदानाचा प्रश्न सोडवला होता. आता पेंशनचा प्रश्न सोडवायचा आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “हा शिक्षकांनी घेतलेला बदला आआहे. कारण सहा वर्ष शिक्षकांची कामं झाली नव्हती, असा त्यांचा आरोप होता. त्याउलट साडेआठ हजार शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, संस्थांची कामं मी स्वत: वेळ देऊन केली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयात असेल. बाळाराम पाटील यांनी पराभवी स्वीकारुन माझं अभिनंदन केलं यासाठी त्यांचे आभार,” असंही ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.

कोकणातील शिक्षकांनी दिलेला कौल मान्य, पराभूत स्वीकारतो : बाळाराम पाटील

“निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. विजयी उमेदवाराचे अभिनंदन करते आणि कोकणच्या शिक्षकांनी दिलेल्या कौल मी खुल्या मनाने स्वीकार करतो. निकाल माझ्या दृष्टीने अनपेक्षित आहे. अश पद्धतीचं वातावरण नव्हतं पण निकाल आलाय तो मान्य करतो. पैशांचा वापर झाला आहे, पण जो कौल कोकणच्या शिक्षकांनी दिला आहे भले तो कोणत्याही कारणाने दिला असेल तो मी दिलखुलासपणे स्वीकारत आणि पराभव मान्य करतो,” अशी प्रतिक्रिया शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी निकालानंतर दिली. 

पाच जिल्ह्यातील शिक्षकांचं मतदान

दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅा महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते. 28 टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत 91 टक्क्यांपर्यंत मतदान केलं होतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish