INDIA NEWS

Press

महेश गणगणे यांचे रेकॉर्ड ब्रेक शक्ती प्रदर्शन.! तर डॉ. गजानन महाले यांचा भाजपला घरचा अहेर..

RaviRaj 29 Oct 2024

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. गजानन महाले व शेकडो कार्यकर्ते..

यावर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जणू जागतिक युद्ध लढवल्या जात असल्यासारख्या होत आहेत फोडाफोडीचे राजकारण व स्थानिकांना उमेदवारी मध्ये डावल्यामुळे यावेळी सर्वच पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत अवघ्या महाराष्ट्रातील आश्चर्यचकित करणारे दोन मतदारसंघ म्हणजे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व अकोट हे आहेत.

महेश गणगणे त्यांचे नामांकन भरण्यासाठी जमलेली हजारो कार्यकर्त्यांची गर्दी..

येथील विद्यमान आमदारांचे कोणत्याही सर्वे मध्ये नाव न आल्याने यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती परंतु दबाव तंत्राचा वापर करून अगदी शेवटच्या क्षणी या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली परंतु मुर्तीजापुर प्रमाणेच अकोट मध्ये सुद्धा भाजपमधील तळागळातील कार्यकर्ते यांना मात्र भारसाकळे यांना दिलेली उमेदवारी जिव्हारी लागली त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सर्व भाजप कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन स्थानिक व संपूर्ण आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलेले डॉ.गजानन महाले यांना उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रोत्साहन दिले

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.गजानन महाले अकोट विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व भाजपचे कार्यकर्ते..

सोबतच संपूर्ण मतदारसंघातील जनतेच्या भावनांचा सन्मान करून डॉ. महाले यांनी प्रकाश भारसाकळे यांच्या विरुद्ध दंड थोपटले आहेत तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश गणगणे यांनी ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन करीत हजारो कार्यकर्त्यांसह आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यापेक्षा कित्येक पटीने जवळपास दहा हजाराच्या वर मतदार संघातील स्थानिक जनसामान्य व कार्यकर्ते उपस्थित होते महेश गणगणे यांच्या नामांकन रॅलीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक आगळावेगळा उत्साह बघायला मिळाला महाविकास आघाडीने स्थानिक उमेदवार देऊन मतदार संघातील जनसामान्यांच्या भावनांचा विचार केल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले

महेश गणगणे व डॉ गजानन महाले यांचा नामांकन भरण्यासाठी ऐतिहासिक जनसमुदाय

सोबतच प्रस्थापित असलेले विद्यमान आ. प्रकाश भारसाकळे यांच्याविरुद्ध डॉ.गजानन महाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल मतदार संघातील तळागळातील कार्यकर्ते व भाजपाचे एकनिष्ठ असलेल्या मतदारांना योग्य पर्याय मिळाला असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले भाजपचे अकोट व तेल्हारा येथील अनेक कार्यकर्ते अप्रत्यक्षरीत्या स्थानिक उमेदवार असलेले डॉ.महाले यांच्या पाठीशी उभे असून यावेळी पक्ष निष्ठेला प्राधान्य देणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे डॉ.महाले यांचा हा महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक अनोखा विजय राहील या माध्यमातून भाजपला त्याची जागा दाखवून देण्याची संधी मिळाली असा निर्धार सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish