मराठा महासंघ नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण व सत्कार समारंभ संपन्न-ज्येष्ठ समाजसेवक मनोहरराव हरणे सह अनेक दिग्गजांची उपस्थिती..
अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी योजना, संघटना विस्तार, सदस्य नोंदणी आदी उपक्रमावर मराठा महासंघाचा भर – मनोहरराव हरणे अध्यक्ष कुणबी समाज विकास मंडळ
RaviRaj 12 August 2023
अकोला :आज दि.१२ ऑगस्ट २०२३ला अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा व महानगर शाखेच्या वतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. आदर्श कॉलनी स्थित जीपीए हॉल येथे आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहरराव हरणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई बिडवे,मधुकरराव देशमुख हे होते . संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी यांची नव्याने नियुक्ती झाल्याने त्यांचा व जिल्हा सल्लागार मंडळ अध्यक्ष श्री मधुकरराव देशमुख यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्षपदी तसेच रूपाली वाकोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज व कै. अण्णासाहेब साहेब पाटील यांच्या प्रतिमेस हारार्पण करून करण्यात आली.
यावेळी जिल्हा शाखा नियुक्त्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विठ्ठलराव वाघ, अरुण खोटरे,श्रीकृष्ण गावंडे, देविदास नेमाडे, यांना घेण्यात आले.तसेच महासंघाच्या महानगर शाखेच्या उपाध्यक्षपदी आनंदराव कठाळे, प्रदीप कदम, प्रवीण शिंदे तसेच बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष पदी अनिल शिरसागर यांची नियुक्ती करण्यात येऊन या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
गाव तिथे शाखा, संघटना विस्तार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज विषयक, सारथी योजना, सदस्य नोंदणी आदी विविध उपक्रम घेऊन संघटना काम करीत असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी महासंघाचे कार्यक्रम घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने राम शेगोकार, महानगर अध्यक्ष श्रीकांत सरोदे, मोरेश्वर चौखंडे, प्रदीप लुगडे, राजेश देशमुख, राजेश पाटील, प्रफुल्ल देशमुख,काशिनाथ पटेकर,शाम वाफदाने, सिंधुताई पवार, रश्मी पटेकर,मनीषा शिंदे, ज्योतीताई कुकडे, सुमनताई भालदाने, राखी पटेकर,माधुरी वाघमारे सीमा लोणकर, सुनीता धवणे,भावना जाधव,अर्पणा कावरे, विमल सरप, माधुरी पटेकर,अनुराग जाधव, उमेश चिकणे, अभिषेक सूर्यवंशी, ओम शर्मा, दिनेश निकम, सतीश शिंदे, दशरथ क्षीरसागर, प्रमोद क्षीरसागर तसेच गायत्री नगर हरिपाठ मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन राजेश देशमुख यांनी केले तर प्रस्ताविक सौ कल्पनाताई बिडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व उपस्थित सन्माननीय मंडळींनी विशेष योजनांची विस्तृत माहिती व वेगवेगळ्या समाज हितउपयोगी विषयांना हात घालून अकोलेकरांना ऊर्जा देण्याचे काम केलेले आहे. आजच्या या अतिविकसित व धकाधकीच्या काळात अशा लोकांची फार गरज असून समाजासाठी झटणारे असे अनेक समाजसेवक अकोलेकरांना लाभले आहेत..