INDIA NEWS

Press

मुर्तीजापुर शहर पोलिस ठाण्यात “थर्ड डिग्री” अत्याचाराचा थरार.. पीएसआय आशिष शिंदे कडून न्यायालयाचा आदेश धाब्यावर..

salim Khan 9 September 2025

पोलीस अधिक्षक अर्चित चांडक तथा ठाणेदार जाधव पीएसआय आशिष शिंदे समोर हातबल..

मा. उच्च न्यायालयाचा वारंवार अपमान करणारा मूर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन चा पीएसआय आशिष शिंदे..

अकोला : जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनला 30 मे 2025 रोजी महाराष्ट्रात बंदी असलेल्या एचटी बीटी कापूस बियाण्याच्या प्रकरणी काही शेतकरी पुत्रांवर गुन्हे दाखल झाले होते. या कपाशीला खर्च कमी व उत्पन्न जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी आहे. शेतकरी पुत्रांनी एकत्रित बियाणे घेतले असताना त्यांच्यावर व्यापारी समजून कठोर गुन्हे दाखल करण्यात आले. नंतर संबंधित आरोपींना 1 ऑगस्ट 2025 रोजी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. न्यायालयाने दर मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले.

परंतु या आदेशाला धाब्यावर बसवत, हजेरीसाठी ठाण्यात गेलेल्या आरोपींना तपास अधिकारी पीएसआय आशिष शिंदे यांनी मागील दोन-तीन आठवड्यांपासून थर्ड डिग्री प्रमाणे बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. बंद खोलीत नेऊन न्यायालयाचा अपमान करून आरोपींना मारहाण केली जात असल्याने ते दहशतीखाली असल्याचे समजते.

गुन्हा दाखल होईपर्यंत आरोपींना पकडण्यात अपयशी ठरलेले शिंदे यांनी आपला अपमान पचवू न शकल्याने सूड म्हणून न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासून आरोपींवर अत्याचार सुरू ठेवले असल्याचे आरोप आहेत. “माझे कुणी काही करू शकत नाही” या गर्विष्ठ भावनेतून ते स्वतःची मनमानी करत असल्याने ठाणे प्रमुख जाधव यांचाही शिंदे यांच्यावर वचक नाही, अशी चर्चा आहे.

या सर्व प्रकाराला कंटाळून आरोपी वैभव भोगे यांनी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन देऊन “बंद खोलीत नव्हे तर कॅमेरासमोर जबाब घेण्यात यावा” अशी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर शिंदे आई-बहीणीस शिवीगाळ करून गैरकायदेशीर मारहाण करतात, असा थेट आरोप भोगे यांनी केला आहे.

पीएसआय शिंदे यांच्या पूर्वीच्या वर्तनावरून असे अनेक मनमानीचे प्रकार झाल्याची माहिती मिळत आहे. आता पोलिस अधीक्षक चांडक आणि मा.न्यायालय या गंभीर आरोपांची दखल घेऊन कठोर कारवाई करतात की पुन्हा एकदा पीएसआय शिंदे यांची पाठराखण केली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish