मुंबईला दुबळी बनवण्याचा प्रयत्न हाणुन पाडा. – बाळासाहेब रास्ते
Ravi Raj 6 NOV 2022
मुंबई. – संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून मुंबई साकार झाली तिला बलशाली व समृदध बनवण्याचे काम येथील कामगार,मच्छीमार,. कष्टकरी महिला यांनी केले आहे.त्या मुंबईची आर्थीक कोंडी करुन येथील अनेक उद्योग व्यावसाय गुजरात मध्ये पळवून नेले जात आहेत व मुंबईला दुबळी करण्याचे पाप केंद्रातील नरेंद्र मोदीचे सरकार करीत आहे ते आपण हाणुन पाडले पाहिजे केवळ मराठी माणुस म्हणुन जर आम्हाला कुणी कुरळत असेल तर त्याच्यावर विश्र्वास ठेवू नका मुंबईला कमजोर करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बळीराजा पार्टी मैदानात उतरुन भविष्यात संघर्ष करणार आहे बळीराजा पार्टी महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बाळासाहेब रास्ते यांची निवड झाली याबद्दल मुंबई मानखुर्द येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. . यावेळी त्यांचे बालाप्रसाद किसवे पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाला कामगार नेते व राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष रोहीदास घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्कार समारंभात बोलताना रास्ते यांनी भविष्यात बळीराजा पार्टी महाराष्ट्रात संकर्षण पर्याय उभा करणार असल्याचे सांगितले राज्याच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर आणि वंचित समाजाच्या न्याय प्रश्नावर मागील दोन ते अडीच दशकापासुन सातत्याने लढा देणारे आणि येथील समाजवादी, डाव्या, स्त्रीवादी, पर्यवारणवादी आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी आपली नाळ घट्ट जोडणारे अभ्यासू नेते बाळासाहेब रास्ते याची बळीराजा पार्टी च्या प्रदेशअध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली. हि बाब अभिमानास्पद आहे म्हणुन आज बाळासाहेब रास्ते यांचा भव्य सत्कार सोहळा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा रहिवाशी संघ यांच्या वतीने व सर्व पुरोगामी पक्ष संघटनाच्या वतीने होत आहे.
या प्रसंगी मोहनराव शिंदे संस्थापक अध्यक्ष जिव्हाळा शेतमजूर असघटित कामगार विकास संघटना, मा. उदयसिह पाटील भैया कोल्हापूर, मा. डॉ. प्रा धनंजय बेडदे,संयोजक ओ. बी. सी. व्ही. जे. एन. टी.संघ,महाराष्ट्र मा. सुजित दादा पगारे, संस्थापक अध्यक्ष चंद्रभागा बहुउधेशीय संस्था मुंबई, मा आनंद होवाळ भारतीय मानवता पार्टी राष्ट्रीय सल्लागार,मा.आनंद मोहन,राष्टीय सचिव रिपब्लिकन फ्रंट महाराष्ट्र, यांनी बाळासाहेब रास्ते यांना भावी वाटचालीस सुभेच्या दिल्या या प्रसंगी मनोहर रुपटक्के,राजाराम भोसले,भिमराव रणखांबे,मधुकर साठे,कविता जांबे विठ्ठल माने,अंकुश रास्ते,उत्तम लोखंडे,विलास भोसले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते