माझे वडील पत्रकार आहेत माझे कुणीच काही करू शकत नाही..आयटीआय मधील कर्मचाऱ्यांची दादागिरी..
chanchal pitambarwale 13 Feb 2025

अकोट आयटीआय मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
वडील पत्रकार असल्याची ओळख दाखवून आयटीआय मध्ये दादागिरी
शिक्षक व कर्मचारी वेळेवर ड्युटीवर येत नसल्याच्या तक्रारी
अकोट
जिल्ह्यातील सर्वच आयटीआय ची परिस्थिती गंभीर आहे आयटीआय च्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही कुठे मुख्याध्यापक नाही तर कुठे मुख्याध्यापकाचा प्रभारी गायब आहे असा भोंगळ कारभार आयटीआय संस्थेचा आहे त्यामध्ये अकोट येथील प्रभारी मुख्याध्यापक सतत गैरहजर व कधी सुट्टीवर असल्याने कुणाचेही नियंत्रण शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर असल्याचे दिसत नाही या आयटीआय प्रशासकीय संस्थेत ग्रामीण भागातील अनेक गोरगरिबांचे मुले शिक्षण घेत आहेत ही संस्था शहराच्या तीन किलोमीटर दूर पोपटखेड रोडवर वसलेली असल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज सहा किलोमीटर पायी चालत जाणे येणे करावे लागते भर उन्हात पावसात हा सर्व संघर्ष करीत विद्यार्थ्यांना आयटीआय मध्ये पोहोचावे लागते परंतु शासनाकडून गडगंज पगार घेत असलेले आयटीआय कर्मचारी यांची मात्र दादागिरी सुरू आहे” हम करे सो कायदा” असा प्रकार सुरू आहे त्यामुळे मुलांना प्रशिक्षण देण्याऐवजी कुणी संघाचा प्रचारक आहे तर कुणाची ओळखी आमदार खासदारापर्यंत आहे आमचे कुणीच काही बिघडू शकत नाही तर कुणाचे वडील पत्रकार आहेत असे आमचे हात किती लंबे आहेत हे दाखवण्याचा उर्मठपणा या शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये ठासून भरलेला आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याची जाण नसलेले हे अहंकारी शिक्षक व कर्मचारी यांना वठणीवर आणण्यासाठी वरिष्ठांकडून काय पावले उचलली जाणार हा येणारा काळच ठरवेल