नागपूर :आर एस एस च्या पायथ्याशी बसून राज्यात अनेक लोकांची फसवणूक करणारे नराधम गुड्डू भैया उर्फ बालेश्वर पुल्लेवार व पप्पू पटेल उर्फ परवेज पटेल ..
salim Khan 24 June 2023
नागपूर : गुड्डू भैया उर्फ बालेश्वर पुल्लेवार हा गेली अनेक वर्षापासून भाजपा व आर एस एस च्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावे सांगून त्यांची ओळख वापरून महाराष्ट्रातील अनेक लोकांची करोडो रुपयांनी फसवणूक करीत आहे. त्यामध्ये वेगवेगळे कामे करून देण्याची हमी देऊन करोडो रुपये अनेक लोकांपासून उकळले आहेत गुड्डू भैया उर्फ बालेश्वर पुल्लेवार हा बाहेर राज्यातून येऊन नागपूर मध्ये अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे.
आरएसएसच्या पायथ्याशी केशव द्वार येथे बसून देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये त्याचे आर्थिक फसवणूक करणारे एजंट पसरलेले आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्याची पाळेमुळे रोवली आहे स्वतः करोडो रुपयांच्या खदानी चा मालक आहे असे भासवून अनेक खदान च्या खोट्या नोटरी करून मी पन्नास हजार करोडचा मालक आहे असे लोकांना सांगून कधी कर्जाची मागणी करीत तर कधी अनैतिक व गैरे कायदेशीर काम करून देण्यासाठी गरीब व मजबूर लोकांकडून पैसे उकळतो हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून नागपूर मध्ये बसून हा गुड्डू भैया करीत आहे यामध्ये यांने केलेल्या फसवणुकी विरुद्ध काही लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा आवाज दाबण्याचं काम बिलाल एंटरप्राइजेस नंदनवन चे पप्पू पटेल उर्फ परवेज पटेल याच्या माध्यमातून हे दोन्हीही नराधम करीत असतात.
बिलाल एंटरप्राइजेस नंदनवन चे सर्वेसर्वा पप्पू पटेल उर्फ परवेज पटेल हे नागपूरमधील विख्यात नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत चार चाकी गाडी खरेदी विक्री करण्याचे काम करीत असतात पप्पू पटेल हे समाज विघातक प्रवृत्ती असून नंदनवन पोलीस हे त्यांच्या खिशात असल्यामुळे अनेक लोकांचा आवाज वेगवेगळ्या माध्यमातून दाबण्याचे काम यांनी केले आहे परंतु गुड्डू भैया व बिलाल एंटरप्राइजेस चे पप्पू पटेल अशा समाजविघातक प्रवृत्ती ची गुंडशाही आता यापुढे चालणार नाही.
अकोल्यातील ज्येष्ठ व्यापारी यांनी पुढाकार घेऊन गुड्डू भैया व पप्पू पटेल यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या असून राज्यातील व देशातील सर्व फसवणूक झालेल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता पैसे वसूल करण्याचा एकमेव मार्ग हा आपल्या शहरांमध्ये संबंधित पोलीस स्टेशनला या दोघांविरुद्ध तक्रारी करून गुन्हे दाखल करणे असे आवाहन केले आहे तसेच अनेक गैर कायदेशीर व समाजविघातक कामे या दोघांनी नागपूर मध्ये बसून केली आहेत यांच्या मुसक्या वेळीच आवळल्या गेल्या नाहीत तर खूप मोठा अनर्थ होईल असे नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक जाणकार व्यक्तींनी सांगितले आहे..