नरसिंग महाराज यात्रेला भव्य दिव्य स्वरूप.! सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
Chanchal pitambarwale 5 December 2024
अकोट मधील प्रख्यात असलेली नरसिंग महाराज यात्रा उत्सव ही वर्षानुवर्षे चालत असलेली परंपरा अविरत अशी कायम सुरू आहे या यात्रेला खूप महत्त्व असून दिवाळीच्या निमित्ताने माहेरी येणाऱ्या सर्व मुली, महिला विशेषता लहान मुलांना या यात्रेचे आकर्षण आहे वर्षभरापासून या यात्रेची आतुरतेने सर्व महिला मंडळी सोबतच लहान मुले सुद्धा वाट बघत असतात दिवाळीनंतर पंधरा दिवसातच सुरू होणारा हा महोत्सव एक महिना सात दिवस सतत सुरू असतो महाराष्ट्रातून अनेक भाविक नरसिंग महाराज यांच्या दर्शनाला येतात व यात्रेचा भरभरून आनंद घेतात
यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एक अनोखा संदेश देऊन जातात यात्रेकरूंच्या सुविधा करिता महिला पोलीस सह जवळपास 40 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातून आलेले व्यवसायिक व यात्रेकरू यांनी समाधान व्यक्त केले आहे दिवसेंदिवस या यात्रेला खूप मोठे भव्य दिव्य स्वरूप येत असून पोलीस प्रशासन हे सज्ज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले..