निवडणुकीचा खर्च सादर करा अन्यथा बरखास्त व्हा तहसीलदाराच्या कठोर नोटीसमुळे सरपंचासह सदस्यांमध्ये दहशत
RaviRaj 29 March 2025

तहसिलदाराची नोटीस धडकली
ग्रामपंचायत सदस्यांमध्ये दहशत भडकली
तहसीलदाराच्या हुकूमशाही कार्यपद्धतीमुळे सरपंचासह सदस्यांमध्ये गोंधळ

अकोट येथील तहसिलदार डॉ सुनील चव्हाण यांनी अचानक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी 25 मार्च 2025 ला सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी नोटीस बजावल्या त्यामध्ये खर्चाबाबत स्वयंस्पष्ट लेखी खुलासा सादर न केल्यास पदावरून बरखास्त करण्यात येईल असा कठोर उल्लेख नोटीस मध्ये असल्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यामध्ये एकच खळबळ माजली

एकाच वेळी सर्व तालुक्यातील सर्व सरपंच व सदस्य यांना सुनावणीकरिता बोलवण्यात आल्यामुळे कार्यालयातील गर्दीमुळे एकच तारांबळ उडाली जवळपास सर्वच सदस्यांनी यापूर्वी निवडणूक झाल्या बरोबर निवडणूक खर्चाचा हिशोब संबंधित विभागाला दिलेला आहे तरीसुद्धा पुन्हा हा सर्व खटाटोप तहसिलदाराकडून कशाला याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे यादरम्यान ज्या सदस्यांनी खर्चाचा हिशोब यापूर्वी दिलेला नसेल त्यांनाच नोटीस द्वारे बोलवण्यात येणे अपेक्षित होते परंतु सर्व सदस्य एकाच वेळी तहसील कार्यालयात जमा झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला

तहसीलदाराच्या नोटीस प्रमाणे कोणतेही नियोजन कार्यालयात दिसत नव्हते अनेक महिला सदस्यांनी या सर्व गंभीर प्रकाराबाबत आक्षेप नोंदवला नोटीस मधील पदावरून बरखास्त करण्याच्या धमकीमुळे तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य दहशतीखाली गेले आहेत काही सदस्यांच्या यापूर्वीच खर्च सादर केल्याच्या पावत्या हरवल्या असल्यामुळे त्यांची मात्र या नोटीसमुळे झोप उडाली आहे

तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांच्या या हुकूमशाही कार्यपद्धतीमुळे अनेक सदस्य सादर केलेल्या खर्चाच्या पावत्या मिळवण्यासाठी सैरावैरा भटकत असून या मतदारसंघात जनसामान्यांचा कुणीच वाली उरला नाही असा नाराजीचा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे