INDIA NEWS

Press

न्याय मिळवण्यासाठी डॉक्टरांसारख्या देव माणसांवर निषेध आंदोलन करण्याची वेळ..! कुठे नेऊन ठेवलाय देश माझा..

Sanjay Shelke. 17 August 2024

कोलकत्ता येथील महिला डॉक्टरला न्याय मिळण्यासाठी अकोट डॉक्टर असोसिएशन तर्फे शहरातील रुग्णसेवा एक दिवस बंद ठेवून निषेध आंदोलन…

निषेध आंदोलनाला संबोधित करताना अकोट येथील विख्यात डॉ. गुजर

कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरामध्ये 17/8/2024 सकाळी 6 वाजता पासून तर 18/8/2024 ला सकाळी 6 वाजेपर्यंत असे 24 तास अकोट मधील रुग्णसेवा बंद ठेवण्यात आले.

कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजीअकोट शहर आणि तालुक्यातील सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी एक दिवस रुग्णसेवा बंद ठेवली..

डॉ. चिंचोळकर यांची आक्रमक भूमिका..

दरम्यान इमर्जन्सी सेवा ही सुरू होती..कोलकत्ता मधील अशा स्वरूपाच्या गंभीर घटनेची यापुढे पुनरावृत्ती होऊ नये याकरिता घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ..

कोलकत्ता येथील घटनेचा निषेध व्यक्त करताना अकोट येथील डॉ .रंदे

म्हणून शहरातील डॉक्टरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, याकूब पटेल चौक, यात्रा चौक, सोनू चौक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय , अशा मार्गाने मूक मोर्चा काढून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन दिले.

अकोट येथील ॲम्बुलन्स संघटनेचा सहभाग

सोबतच डॉक्टरांवरील वाढते हल्ले आणि महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.. तसेच कोलकत्ता येथील घटना अतिशय निंदनीय असून मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी या संदर्भात संपूर्ण देशामध्ये आज वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

अकोट येथील शिवाजी चौक मध्ये सर्व डॉक्टर असोसिएशन व इतर संघटना यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला..

या आंदोलनामध्ये आय एम ए अकोट, निमा, डेंटल संघटना, होमिओपॅथिक असोसिएशन, पॅरामेडिकल असोसिएशन, नर्सिंग संघटना, ॲम्बुलन्स संघटना, इत्यादी जवळपास सर्वच संघटनांनी सहभाग घेतला होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish