नाना पटोले यांना डॉ. रणजीत पाटील यांनी मॅनेज केले आहे काँग्रेस पक्ष बोगस-काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे वक्तव्य..
D k mandve 28 Jan 2023
अकोला: अमरावती पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार यांनी एक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांसमोर प्रसारित केली त्यामध्ये शरद झांबरे धीरज लिंगाडे यांच्याशी फोनवर बोलत आहेत धीरज लिंगाडे हे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार असून नाना पटोले यांना भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांनी मॅनेज करून ठेवले आहे म्हणूनच अगदी शेवटच्या क्षणी धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे लिंगाडे यांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्याचा राग म्हणून लिंगाडे यांनी काँग्रेस पक्ष एक नंबरचा बोगस आहे असे वक्तव्य शरद झांबरे यांच्या सोबत बोलताना केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लिंगाडे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस मधील नाराज नेत्यांमध्ये व प्रस्थापितांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे या ऑडिओ क्लिप मुळे पदवीधर सुद्धा गोंधळले आहेत अमरावती पदवीधर मतदारसंघात उमेदवारांच्या या आपापसात भांडणामध्ये पदवीधर कुणाकडे कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..