नामांकित बिल्डर, शाळा व बँक संचालक संशयाच्या भोवऱ्यात..भ्रष्ट अधिकाऱ्यांसह लेआउट माफीयांचे धाबे दणाणले..
salim khan 5 june 2025

नामांकित बिल्डर विरुद्ध किस्मत खान मैदानात..
अकोट शहरांमध्ये चाललंय तरी काय ! वरली क्लब माफिया, व आता लेआउट माफिया यामध्ये अनेक गैर कायदेशीर प्रकार करून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप किस्मत खान यांनी केला आहे .अकोट पोपटखेड रोडवरील ग्रामपंचायत मोहाळा हद्दीतील लखमापूर शिवारातील गट नंबर 45 व गट नंबर 37 या लेआउट क्षेत्रफळाची फेरचौकशी प्रकरण उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या समोर खान यांनी दाखल केले आहे

या लेआउट प्रकरणांमध्ये अकोट शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नामांकित बिल्डर, शाळा व बँक संचालक असे अनेक दिग्गज गोवल्या जाण्याची शक्यता आहे या प्रकरणाची सुनावणी 30 मे रोजी झाली असून या सुनावणीला अपिलार्थी किस्मत खान हे स्वतःच्या वकिलासह हजर होते परंतु नोटीस मिळाल्यावरही विरुद्ध पक्षाचा एकही उमेदवार सुनावणीस हजर नव्हता त्यामुळे मनोज लोणारकर यांनी पुन्हा नोटीस काढण्याचा आदेश करून पुढील तारखेला दोन्हीही पक्षकार सुनावणी करिता हजर राहतील अशी व्यवस्था केली सदर लेआउट प्रकरणांमध्ये पाच नामांकित असलेले दिग्गज मंडळी सुद्धा चांगलेच अडकणार असल्याची माहिती अपीललार्थी किस्मत खान यांनी दिली असून 18 जून ला या गंभीर व संवेदनशीत प्रकरणांमध्ये उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

सदर लेआउट मधील दोन गट नंबर जोडणारा रस्ता हा पूर्णपणे गैरकायदेशीर प्रक्रिया करून रद्द करण्यात आला तसेच नकाशा मधील ओपन स्पेस हा प्रत्यक्षात पूर्ण असल्याचा दिसत नाही असे अनेक गंभीर प्रकार या लेआउट मध्ये झालेले आहेत त्यामुळे हे लेआउट रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केलेले आहे 30 मे रोजीच्या सुनावणीमध्ये गैरअर्जदार पैकी कोणीही हजर झालेले नाही पुढील सुनावणी तारीख 18 जून असून गैरअर्जदारांना हजर होण्यासाठी पुन्हा नोटीस काढण्यात आल्या आहेत
अॅड फाजील पटेल
ज्येष्ठविधीज्ञ अकोट