अकोट मधील अकोला रोड वर श्रीहरी हॉटेलच्या पार्किंग मुळे ट्रॅफिक जाम होऊन आपापसात उफाळलेला वाद…
अकोट-अकोला जिल्ह्यातील अकोट शहर हे खूप संवेदनशील मानले जाते त्यामुळे अकोट मधील पोलीस यंत्रणा ही सुद्धा सण उत्सव अशा अनेक प्रासंगिक घडामोडींकरिता सज्ज असते परंतु आज दिनांक 14/8/ 2022 सायंकाळी ९ वाजता अकोला रोडवरील हॉटेल श्रीहरी च्या पार्किंग मुळे व सोबतच कावळ यात्रेनिमित्त येणारे भाविक व धारगड ची यात्रा भावनिक उत्सव एकत्रित आल्यामुळे व त्यामध्ये च श्रीहरी हॉटेलवर खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असल्यामुळे हॉटेलच्या अनियोजित व मुख्य रस्त्यावर सर्व गाड्यांची पार्किंग असल्यामुळे सर्व वाहतूक व्यवस्था एक तास खोळंबली होती या सर्व प्रकारामुळे ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या सर्व खाजगी वाहने व त्यामधील आरोग्य विषयक समस्या असलेले अनेक महिला मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागला श्रीहरी हॉटेलपासून तर अग्रवाल पेट्रोल पंप पर्यंत सतत एक ते दीड तास ट्रॅफिक जाम मुळे अनेक लोकांमध्ये किरकोळ वाद झाले तर काहींनी तर एसटी महामंडळाच्या बसला सुद्धा लाथा बुक्क्या मारल्या परंतु प्रसंगावधान राखून तात्काळ श्रीहरी हॉटेल मधील काही समजदार व्यक्तींनी मध्यस्थी करत विकोपाला जाणारे वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला एवढा सर्व प्रकार घडत असताना अकोट पोलिसांना मात्र या प्रकाराची माहिती सुद्धा नव्हती एका समाजसेवी व्यक्तीने अकोट पोलिसांना याची माहिती दिली असता तब्बल एक तासानंतर अकोट पोलीस काही कर्मचाऱ्यासह ताफा हजर झाला तोपर्यंत खूप जास्त प्रमाणात ट्राफिक कमी झालेली होती… काही समजदार व्यक्तीमुळे आज किरकोळ वादाचे रूपांतर विकोपाला जाऊन मोठ्या स्वरूपात गाड्यांची तोडफोड व एसटी महामंडळाच्या बस चे नुकसान होता होता वाचले….