INDIA NEWS

Press

फुकट तिकीट घेणार बळी, भंगार बसेस मुळे प्रवाशांमध्ये दहशत

salim khan 21 June 2025

एसटी बसेस महाग तर अकोटकरांचा जिव स्वस्त..

प्रवासी बालबाल बचावले, अपघाताची पुनरावृत्ती टळली..

काल अमरावती डेपोची भंगार बस ही अकोट वरून अमरावती प्रवाशांना घेऊन जात असताना श्रद्धासागर जवळ अचानक बसचे मागील टायर बाहेर आले चालकाने प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण साधले त्यामुळे 60 ते 70 प्रवाशांचे जीव वाचले..
असाच भयंकर प्रकार तीन महिन्यापूर्वी आकोट आगाराच्या बसमुळे घडला होता पोपटखेड रोड वर चालत्या बसने पेट घेतला होता त्यामध्ये सुद्धा सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु अकोट आगारातील भंगार बसमुळे वेळोवेळी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो हे वारंवार स्पष्ट होत आहे तरी सुद्धा जाणीवपूर्वक अकोट आगार मात्र नवीन बसेस पासून वंचित ठेवला जात आहे

वारंवार इंडिया न्यूज ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते तरी या निगरगट्ट सरकारला घाम येत नसून प्रवाशांच्या जिवांशी खेळ खेळण्यातच फडणवीस सरकार तथा विद्यमान आमदारांना आनंद मिळतो की काय असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चालत्या बसचे टायर बाहेर येणे ही फार मोठी गंभीर बाब असून अकोट आगाराची सुद्धा यापेक्षाही भयंकर अवस्था आहे अख्ख्या महाराष्ट्रात सर्व आगाराला नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या परंतु राज्यातील एकमेव अकोट मतदार संघ मात्र नवीन एसटी बसेस पासून वंचित राहिले आहे मतदारसंघात एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ही लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांची असते परंतु अकोट मतदार संघ हा थकलेला असल्यामुळे पाठपुरावा करण्यात अयशस्वी ठरला आहे तसेच एसटी बसेस पेक्षा आकोट करांचा जीव फार स्वस्त असल्यामुळे अकोट आगाराला नवीन बसेस देणे सरकारला परवडत नाही त्यामुळे भंगार बस मध्येच जिव मुठीत घेऊन प्रवाशांना यापुढे प्रवास करावा लागणार हे निश्चित?

अशी मानसिकताच आकोटकरांनी बनवली असून जनतेच्या जिवांशी खेळण्या- इतपत इतक्या खालच्या पातळीवर अकोटचे राजकारण यापूर्वी कधी गेले नाही “कोई मरता है तो मरने दो, हम फिर भी चुनके आयेंगे ” असा आत्मविश्वास असणार्या लोकप्रतिनिधींना यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र हिसका दाखवणार अशा आक्रमक प्रतिक्रिया अनेक चिडलेल्या प्रवाशांनी बोलून दाखवल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish