INDIA NEWS

Press

पदवीधरांच्या हक्कासाठी निवडणूकीच्या मैदानात- प्रा.प्रविण बोंद्रे

Lalit nagrale 14 Jan 2023

प्रा.प्रविण बोंद्रे

अकोट :
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक येत्या ३० जानेवारीला होऊ घातली
आहे.भाजप,काॅंग्रेस या पक्षांसह अपक्ष निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील प्रा.प्रविण बोंद्रे हे पदवीधारक यांच्या हक्कासाठी निवडणूक लढवित आहेत.पदव्या प्राप्त करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ते घ्याव्या लागतात.पण दिवसेंदिवस बेरोजगार पदवीधर तरुण तरणींची संख्या ही वाढत आहे.शासनाने अजूनही बेरोजगार भत्ता सुरु केला नाही.पदवीधारकांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रा.प्रविण बोंद्रे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

पदवीधारकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहिजे जेणेकरून तो आपले प्रश्न शासन दरबारी मांडू शकेल.शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या भरतीचा प्रश्न असो तसेच २००५ नंतर पेन्शन बंद करण्याचा निर्णय असो.याबाबत जुनी पेन्शन योजना सरकारने लागू करावी.पदवीधर बेरोजगारांना किमान एक हजार रुपये भत्ता द्यावा.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा कोणाताही विद्यार्थी विद्यार्थिनी यापासून वंचित राहता कामा नये आदी मागणींसाठी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे असे प्रा.प्रविण बोंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish