INDIA NEWS

Press

पुंड्यातील शेतकऱ्यांचा जनआक्रोश.. बोगस खताची भरपाई द्या.. अन्यथा रास्ता रोको आंदोलन..

RaviRaj 5 August 2024

पुंडा येथील ग्रामस्थांचा आक्रोश..

अकोट तालुक्यातील व अकोला पूर्व मतदार संघातील पुंडा गावातील अनेक शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात बोगस खते देऊन फसवणूक झाली आहे.. अगोदरच सततच्या मुसळधार पावसाने शेतकरी पुरता हैराण झालेला आहे त्यामध्येच पिकाला लागणारे रासायनिक खत हे सुद्धा बोगस निघाले आहे रामा फर्टीलायझर कंपनीचे 10. 26. 26 व डीएपी खत हे पूर्णपणे माती मिसळलेले असून चुना लावण्याचे काम रामा फर्टीलायझर अकोट मधील बी एम झुंनझुनवाला व वृषाली कृषी केंद्र यांनी केले आहे..

लाखो रुपयाचे बोगस खते एकट्या पुंडा या गावात विकल्याची माहिती समोर आली आहे अनेक शेतकऱ्यांनी शेतातून हे बोगस खत घरी परत आणले तर काहींनी लक्षात न आल्याने हे नकळत शेतात पिकाला टाकले परंतु त्याचा काहीच उपयोग पिकाला झाला नसून उलट शेतातील पीक हे पूर्णपणे खराब होऊन उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.. त्यामुळे खताच्या रकमेसह संपूर्ण वर्षभराचे पीक सुद्धा या खतामुळे वाया गेले.. आता शेतकऱ्यासमोर आत्महत्या शिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही.. तात्काळ खताची व संपूर्ण पिकाची भरपाई न मिळाल्यास रामा फर्टीलायझर, बी एम झुनझुनवाला व वृषाली कृषी केंद्रा सह कृषी अधिकाऱ्याला सुद्धा घेराव घालण्याचा इशारा पुंडा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे..

भरपाई न मिळाल्यास कृषी केंद्र ,कृषी अधिकारी व विद्यमान आमदार यांना घेराव घालणार

तसेच संपूर्ण तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी अशा बोगस कंपन्यांना व कृषी केंद्रांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी खूप मोठे जन आक्रोश आंदोलन उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा..असे आवाहन समाजसेवक अरुण काकड यांनी समस्त शेतकरी बांधवांना केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish