पिकाला हमीभाव द्या! अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार..नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी संघर्ष संघटनेचा एल्गार..
Balu patil 12 june 2024
सोयाबीन, कापूस व तुर पिकाला हमीभाव देण्याची मागणी
शेतकरी संघर्ष संघटनेचे पंतप्रधानांना निवेदन..
वाशिम – सोयाबीन या कृषीपिकाला ८ हजार रुपये, कापुस पिकाला १० हजार रुपये व तुर पिकाला १२ हजार रुपये हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु वानखेडे यांच्या नेतृत्वात ११ जुन रोजी पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले..
महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस व तूर हे मुख्य पिक असून अंदाजे ७५ टक्के क्षेत्रामध्ये शेतकरी हे पिक घेत आहेत. शेतकर्यांना या पिकासाठी उत्पादन खर्च खुप जास्त येत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा व खान्देश या भागात सोयाबीन, कापूस व तूर हे मुख्य पिक शेतकरी घेतात. गेल्या काही वर्षापासुन सोयाबीन, कापूस व तूरीला मार्केटमध्ये खुप कमी बाजार भाव मिळत आहे. मात्र उत्पादन खर्च वाढत आहे.
परिणामी शेतकरी खुप संकटात सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सोयाबीन या पिकाला कमीत कमी ८००० रुपये, कापूस या पिकाला १०००० रुपये व तूर या पिकाला १२००० रुपये हमी भाव देऊन शेतकरी हितासाठी जातीने लक्ष देऊन शेतकरी संघर्ष संघटनेकडून केलेली मागणी पूर्ण करावी अन्यथा शेतकरी हितासाठी संघटनेकडून आंदोलनाची पावले उचलण्यात येतील
🔥तसेच🔥
खरीप हंगाम पेरणीपुर्वी शेतकर्यांना भावांतर योजनेचा लाभ द्या अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सद्धा शेतकरी संघर्ष संघटनेने केली आहे..
येत्या खरीप हंगामात पेरणीपुर्वी शेतकर्यांना भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघर्ष संघटनेने केली असून याबाबत ११ जुन रोजीच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु वानखेडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना सुद्धा मागण्यांचे निवेदन दिले ..
महाराष्ट्र सरकारच्या १६ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी ४ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व तशी घोषणासुध्दा करण्यात आली होती. परंतु या निर्णयाचा लाभ आजतागायत महाराष्ट्रातील शेतकर्यांना मिळाला नाही.
सद्या खरीप हंगाम जवळ आला असल्यामुळे सरकारने कुठलीही अट न घालता सरसकट सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यात तातडीने भावांतर योजनेचा निधी जमा करावा. अन्यथा शेतकरी हितासाठी शेतकरी संघर्ष संघटनेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे..