INDIA NEWS

Press

पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचा कार्यपद्धतीला क्लब माफिया मनिष कराळे चे थेट चॅलेंज..

salim khan 20 October 2025

विरोधी उमेदवार व मतदारांना स्मशानात लाकडे पाठवून मारून टाकण्याची धमकी..

Akot: आगामी निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहेत माजी आजी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये नगरपालिका तथा जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये निवडून येण्यासाठी चढाओढ लागली आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा अनेक नेते मंडळी गर्दी करू लागले आहेत मात्र “मला निवडणुकीत हरवल्यास म्हणजेच माझ्या नादी कुणी लागल्यास त्याचे लाकडे स्मशानात दिसतील” कुणीही आजमावून बघितल्यास तो जिवंत राहणार नाही” असा धमकी देणारा मेसेज मागील दोन दिवसापासून खुलेआम सोशल मीडियावर फिरू लागला आहे ही दहशत माजवण्याचा प्रयत्न कुख्यात असलेला क्लब माफिया व मतदारांवर नेहमीप्रमाणे दादागिरी करून नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणारा शिंदेसेनेचा उपजिल्हाध्यक्ष मनिष रामाभाऊ कराळे करीत आहे

मागील पंधरा ते वीस वर्षापासून या गुंड प्रवृत्तीला आकोटकर हैरण झालेले असून गजानन नगर येथील रहिवासी दहशतीखाली जगत आहेत सोशल मीडियावर खुलेआम धमकी देण्याची हिंमत दोन कवळीचा गुंड करतो तरी कसा ? एक प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला पायपुसणे समजून स्वतःला दाऊद इब्राहिम व अरुण गवळी अशा अनेक गुंडांसारखी उपमा देऊन जनतेवर दहशत निर्माण करून कायम ठेवण्यासाठी धडपड करीत आहे अकोट शहरातील सामाजिक वातावरण खराब करण्याचे काम नियमित या गुंड प्रवृत्ती कडुन केल्या जात आहे. त्यामुळे स्वतःला खूप मोठा डॉन समजनारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या भरोशावर गोरगरीब जनतेवर दादागिरी करून प्रभागातच नाही तर संपूर्ण शहरात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न तथाकथित शिंदे सेनेचा गुंड नेता करीत आहे

मनिष कराळे याच्या धमकीमुळे मतदार तथा उमेदवार सुद्धा दहशती खाली गेले आहेत अल्पवयीन मुलांना अवैध धंद्यांच्या आहारी नेऊन गुंड टोळीमध्ये सामील करून अनेक परिवार याने बरबाद करून टाकले आहेत या टोळीच्या माध्यमातून मतदानाच्या वेळी सुद्धा घरोघरी जाऊन अख्या कुटुंबाला धमक्या देऊन मतदारांना घाबरवुन मतदान पदरात पडून घेण्याचा गंभीर प्रकार मनिष कराळे कडून नियमित होत असल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत प्रभागातील गोरगरिबांनी मेहनत करून एक एक रुपया जमा करून घरे दारे घेतली आहेत त्यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या दहशतीला कंटाळून जीव मुठीत घेऊन गजानन नगर वाशी कसेबसे जगत आहेत या टोळीच्या दहशतीमुळे अकोट शहर सोडून जाण्याचा विचार व मानसिकता अनेकांनी केली मात्र आयुष्यभराची पुंजी, संपत्ती सोडून जाणार तरी कसे? त्यामुळे या गुंडांचा मानसिक,आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करीत आहेत या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उचलल्यास त्याला मारहाण करून त्याच्या परिवाराला मानसिक त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवून कायमस्वरूपी बंदोबस्त केला जातो

हा सर्व प्रकार मागील वीस वर्षापासून सतत सुरू असून पोलीस मात्र हतबल असून बघ्याची भूमिका घेत आहेत एक प्रकारची या माफियाच्या कृत्याला मुकसंमती तथा प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे म्हणूनच या गुंड व समाजविघातक प्रवृत्तीची हिंम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे आजपर्यंत कुणीही जनसामान्यांनी या घातक प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उचलला नाही मात्र आता यापुढे अकोटकरांची सहनशक्ती संपली असून यावेळी मनिष कराळे विरोधात अनेक उमेदवारांनी कंबर कसली आहे सोबतच या माफीयांच्या दहशतीला कंटाळलेले प्रभागातील तथा संपूर्ण गजानन नगर अकोट शहरातील मतदारांनी एल्गार पुकारला आहे. मनिष कराळे व त्याच्या पाळलेल्या गुंडांना हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या समाज विघातक प्रवृत्ती असलेल्या मनिष कराळेला निवडणुकीमध्ये हरवून त्याच्या दहशतीमधून कायमस्वरूपी मुक्त होणार असल्याच्या भावना संपूर्ण गजानन नगरवाशी यांनी व्यक्त केल्या आहेत

बस पुरे झाले आता” यापुढे या गुंडांची दहशत सहन केल्या जाणार नाही असा आक्रमक पवित्रा अकोटकरांनी घेतला असून निवडणुक हरल्यानंतर मनिष कराळे हा किती लोकांना स्मशानात पाठवणार? “निवडणुकीमध्ये पडणाऱ्या उमेदवारांचा जीव घेणार की संपूर्ण मतदारांचा” हे बघणे आता महत्त्वाचे झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish