पुन्हा एकदा अकोट अकोला रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर – मनोज गुप्ता
Raviraj 19 Jan 2023
अकोट अकोला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा गांधीग्राम येथील पूल याला अचानक चार महिन्यापूर्वी तडे गेले असल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात आला त्यानंतर अकोट वाशियांकरिता सुविधा म्हणून रेल्वे प्रशासनाने अतिशय घाई गडबडीने व विद्यमान सरकार मधील लोकप्रतिनिधी यांनी खूप मोठा वाजागाजा करीत पॅसेंजर रेल्वे मागील तीन महिन्यापूर्वी पासून सुरू केली आहे परंतु अकोट रेल्वे स्टेशन येथे अजूनही कुठलीही अत्यावश्यक सेवा सुविधा प्रवाशांना मिळत नाहीत असे आरोप अकोट येथील सामाजिक कार्यकर्ता मनोज गुप्ता यांनी थेट निष्क्रिय लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनावर केले आहेत महिलांकरिता बाथरूमची व्यवस्था नाही कॅन्टींन सुद्धा अजून पर्यंत सुरू झालेले नाही पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केलेली नाही तसेच प्लॅटफॉर्मवर उघड्यावर असलेलापेवर ब्लॉक अजून पर्यंत दुरुस्त केलेले नाही त्यामध्ये लहान मुले पडण्याची सतत भीती असते आरपीएफ संरक्षण गार्ड नाहीत रेल्वे तिकीट काढण्यासाठी मुबलक वेळ प्रवाशांना मिळत नाही ट्रेन अकोटला पोहोचल्यानंतर त्यामध्ये काही कंत्राटी मुले अकोला येथूनच छापील तिकीट घेऊन येतात त्यामुळे तिकीटा करिता मुबलक वेळ मिळत नाही कमी वेळ असल्यामुळे तिकीट खिडकीजवळ प्रवाशांची दमछाक होताना दिसते विशेषता महिलांची तिकीट काढण्याकरीता भरपूर फजिती होते गाडीमध्ये व प्लॅटफॉर्मवर सुद्धा टीसी नसल्यामुळे अनेक प्रवासी सर्रास विना तिकीट अकोट अकोला प्रवास करीत असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सरकार व रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येताना दिसत आहे अकोट वाशियांवर हा अन्याय सतत सरकारकडून व सरकारी यंत्रणांकडून अनादी काळापासून सुरू असून अकोट वाशियांचा सहनशक्तीचा अंत सरकार व रेल्वे प्रशासन यांनी पाहू नये अशी अनेक प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेण्याची खंत इंडिया न्यूज चे वरिष्ठ पत्रकार यांच्याकडे व्यक्त केली आहे