INDIA NEWS

Press

प्रशांत पाचडे बाजार समितीच्या इतिहासातील यशस्वी सभापती! मात्र सहकार गटातील अनेक नेत्यांची तीव्र नाराजी..

salim khan 28 September 2025

Akot: काल अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रशांत पाचडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर, प्रत्यक्ष भेटीत आणि दूरध्वनीवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला. व्यापारी, अडते, अधिकारी-कर्मचारी, मजूर वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी बांधव सगळ्यांनीच “आपला सभापती” म्हणून पाचडे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
पाचडे हे केवळ सभापती नाहीत, तर शेतकऱ्यांच्या मनाचा आवाज आहेत. शांत, सुसंस्कृत, अभ्यासू आणि निस्वार्थी नेतृत्व म्हणजेच प्रशांत पाचडे. दोन वर्षांपासून त्यांनी समितीचा कारभार असा पारदर्शक ठेवला आहे की, “एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा डाग नाही” हे वाक्य त्यांच्या नावाशी कायम जोडले गेले आहे.

आजच्या काळात सत्ता, पैसा आणि इगोच्या राजकारणाने शेतकऱ्यांची होळी होत आहे, त्या काळात शेतकरी हिताला प्राण मानणारे पाचडे हे अपवादात्मक व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांच्या भावना उचंबळून आल्या “अशा सभापतीला हटवणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय.” “समितीचे भविष्य पाचडे यांच्या नेतृत्वाशिवाय अंधारात ढकलणे म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात.” अशा सन्मानाच्या भावना शेतकऱ्यांच्या हृदयातून निघत आहेत
सहकार गटातील काही वरिष्ठांचे घाणेरडे राजकारण, इगो, वर्चस्वाचा नाद आज शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे कारण ठरले आहे. “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा सभापती मिळाला आहे, आता पुन्हा राजकारणाच्या नावाखाली तो हिरावून घेऊ नका” ही हाक प्रत्येक शेतकरी बांधव मनापासून देत आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा इतिहासात असे व्यक्तिमत्व पुन्हा मिळणे अशक्य आहे. “पाचडे कायम सभापती राहिले, तरच समिती महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावेल.” असा सूर सर्वत्र घुमत आहे
पाचडे यांना सभापतीपदावर कायम ठेवणे! हाच खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा सुकर मार्ग आहे कारण ते फक्त व्यक्ती नाहीत, तर शेतकऱ्यांची आशा, विश्वास आणि भविष्यातील आधारस्तंभ आहेत. त्यामुळे प्रशांत पाचडे हे शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करतात की या घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish