अहो “आमदार साहेब” जरा एसी च्या बाहेर या.. एसटीचा प्रवास झाला भकास..एसटी गुदमरली प्रवास कंटाळवाणा, नागरिकांमध्ये रोष..
dipak dabhade 21 April 20225

अकोट
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मागासलेले बस स्टॅन्ड हे आकोट बस डेपो आहे येथे मूलभूत सुविधा ह्या कधीच बघायला मिळत नाही अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व एसटी बस स्टॅन्ड हे विकसित झालेले आहे खडीकरण, काँक्रिटीकरण सह बस डेपो इमारत बांधकामे होऊन वर्ष झाले आहेत अकोट डेपोच्या आजूबाजूचे सुद्धा तेल्हारा ,दर्यापूर, अंजनगाव, येथील संपूर्ण बस स्टॅन्ड विकसित झालेले आहेत परंतु अकोट बस स्टॅन्ड नेहमीप्रमाणे भंगार स्थितीत उभे आहे एकमेव राहिलेले अकोट बस स्टॅन्ड चे बांधकाम मात्र अगदी शेवटच्या क्षणी सुरू झालेले आहे आता ते पूर्ण कधी होईल याची हमी कोणीच देऊ शकत नाही
यादरम्यान एका महिन्यापूर्वी भंगार असलेली बस शिवपुर बोर्डी येथे जात असताना पोपटखेड रोडवर जळाली होती त्यामुळे याचे सर्व खापर शासनाने डेपो मॅनेजर पिसोडे यांच्यावर फोडले परंतु अकोट डेपो मधील सर्व बसेस ह्या भंगार झालेल्या आहेत मर्यादेपेक्षा जास्त किलोमीटर चाललेल्या आहेत त्यामुळे ह्या भंगार बसेस रस्त्यावर चालण्याजोग्या अजिबात नसताना डेपो मॅनेजरला खूप मोठी कसरत करून या भंगार बसेस रस्त्यावर सुरू ठेवाव्या लागल्या तसे पाहता अकोट आगाराला तात्काळ नवीन पन्नास बसेसची गरज असताना नवीन बसेस उपलब्ध न करून देता उलट अधिकाऱ्यावर दबाव आणून भंगार बसेस चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम वरिष्ठांकडून केल्याचे दिसून येते या सर्व प्रकारामुळे भंगार बसेस ह्या रस्त्यावर चालवणे खूप मोठे आव्हान डेपो मॅनेजर पिसोडे यांनी स्विकारले होते .एकीकडे वरिष्ठांचा आदेश व दुसरीकडे प्रवाशांची सुरक्षा यामध्ये डेपो मॅनेजर हे सतत दबावात असून दोन्ही बाजूने हा अधिकारी भरडला गेला तरीसुद्धा डेपो मॅनेजर पिसोडे यांना जाणीवपूर्वक निलंबित केले आहे यामागे वरिष्ठांकडून वचपा काढण्याच्चा हेतूने हा प्रकार केल्याचे दिसून येते

यापूर्वी अमरावती आगाराची शिवशाही बस जळाली होती त्यामध्ये संबंधित डेपो मॅनेजरला निलंबित केले गेले नाही असाच आणखीन एक प्रकार नागपूर आगारामध्ये सुद्धा घडला तिथे सुद्धा डेपो मॅनेजरला जबाबदार धरण्यात आले नाही एस टी महामंडळ कडून जबरदस्तीने एसटी बसेस ची मर्यादा संपल्यावरही नवीन बसेस न देता भंगार बसेस चालवण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरला दिली असता हा प्रकार घडला यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही तरीसुद्धा पिसोडे यांना वरिष्ठांनी निलंबित केले आहे त्यामुळे अकोट आगाराची गेल्या महिन्याभरापासून वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे प्रवाशांचे अतोनात हाल सुरू आहेत हा सर्व प्रकार संशयास्पद असून पिसोडे यांच्यावर वचपा काढण्याच्या हेतूने हा निलंबन प्रकार करण्यात आला का ? तसेच यामध्ये राजकारण करून पिसोडे यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचे कटकारस्थान करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल करण्यासाठी अकोट डेपो मॅनेजरला जाणीवपूर्वक निलंबित केल्याचे दिसून येते वरिष्ठांचा वचपा काढण्याचा हा एक नवीन फार्मूला असल्याची कुजबुज सर्वत्र शहरामध्ये ऐकायला मिळत आहे डेपो मॅनेजर पिसोडे यांच्या अखत्यारीत सुरू असलेली वाहतूक ही अतिशय योग्य व वेळेनुसार होती भंगार बसेस का असेना परंतु वेळापत्रकानुसार व योग्य वेळेचे नियोजन साधून कोणताही मानसिक त्रास हा प्रवाशांना होत नव्हता त्यामुळे अरविंद पिसोडे यांचे निलंबन केल्यापासून एसटी प्रवास हा कठीण व कंटाळवाणा झाला आहे त्यामुळे या निलंबन प्रक्रियेमध्ये प्रवाशांचा विचार करून तात्काळ वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी अनेक प्रवाशांकडून होत आहे..