आ. प्रकाश भारसाकळे यांनी बोर्डीकरांचा अंत पाहू नये..भक्तांच्या श्रद्धेला खोट्या आश्वासनांची गरज नाही..
Sanjay Shelke 19 August 2024
सातपुड्याच्या पायथ्याशी व अकोला जिल्ह्यातील अकोट च्या बाजूला वसलेले बोर्डी हे एक ऐतिहासिक गाव आहे येथे प्राचीन व विख्यात असलेले नागास्वामी महाराजांचे मंदिर आहे या मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे..त्यासोबतच 225 वर्षाची रथाच्या मिरवणुकीची परंपरा सुद्धा अविरत पणे अखंड सुरू आहे.. या ठिकाणी श्रावण महिन्याच्या वातावरणात अकोला जिल्ह्यातील राजराजेश्वर कावड यात्रा तर धारगड महोत्सव यामुळे हा परिसर सर्व भावीक भक्तांनी गजबजलेला असतो..
यादरम्यान नागास्वामी मंदिराला लाभलेला ऐतिहासिक वारसा व जिल्ह्यातूनच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांचे श्रद्धास्थान असल्यामुळे या मंदिराचा विकास व भक्तांच्या सोयी सुविधा करिता ट्रस्ट समिती ही धडपड करीत असते..
याकरिता अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार सुद्धा मागील दहा वर्षापासून दरवर्षी न चुकता या मंदिराला भेट देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचा निधी देण्याची घोषणा करून मोकळे होतात..कधी मंदिराला सभा मंडप देण्याची घोषणा करतात तर कधी स्वच्छतागृहाकरिता तीस लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करतात परंतु मागील दहा वर्षापासून एकही शब्दांची अंमलबजावणी विद्यमान आमदारांनी केलेली नाही.. दर्शनाला येऊन फक्त भक्तांच्या टाळ्या घेण्यासाठीच आश्वासनाचा पाऊस पाडण्याचे काम आजपर्यंत प्रकाश भारसाकळे यांनी केले आहे..त्यामुळे सर्व भक्त मंडळींमध्ये आमदारांबाबत तीव्र नाराजी आहे..
त्यामुळे आमदार प्रकाश भारसाकळे यांचा खरा चेहरा आता भक्त मंडळींना व अकोट मतदार संघातील जनतेला दिसून आला आहे .बोर्डी येथील नागास्वामी महाराज यांच्यावर भक्तांची खूप मोठी श्रद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचा भक्त परिवार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त परिवार हा बोर्डी या गावात नियमितपणे येत असतो परंतु अकोट वरून बोर्डी गावात जाताना नवीनच बांधकाम केलेल्या रस्त्याची अक्षरशा चाळणी झालेली आहे संपूर्णपणे मुंबई पुण्यावरून आलेल्या भक्तांना खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करून नागास्वामी महाराजांच्या दर्शनाला यावे लागते परंतु या सर्व समस्यांप्रति झोपा काढणारे प्रकाश भारसाकळे हे गंभीर नसून त्याच रस्त्यावरून बोर्डी गावात येऊन स्वतःला विकास महर्षी म्हणवुन घेणाऱ्या आमदारांना बोर्डीच्या जनतेसमोर उभे राहण्याची हिंमत होते तरी कशी ? एवढ्या निगरगट्टपणाची कला ही जगाच्या पाठीवर फक्त विद्यमान आमदारांच्या अंगी संचारलेली आहे तरीही तात्पुरते का होईना दरवर्षी नागास्वामी महाराजांच्या दर्शनाच्या निमित्ताने खोटे आश्वासन देऊन स्वतःसाठी टाळ्या वाजवून घेण्याचे काम हे विद्यमान आमदारांना चांगले जमत असून याचा खूप मोठा दांडगा अनुभव सुद्धा विद्यमान आमदारांना आहे अशी चर्चा भक्त परिवारांमध्ये रंगलेली आहे याचीच पुनरावृत्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होणार आहे अशी खात्री असल्याची सुद्धा बोर्डीकरांनी बोलून दाखवली..
त्यामुळे आमदाराच्या कोरड्या आश्वासनाला यापुढे बळी पडणार नसून मागील दहा वर्षात कोणताही निधी किंवा कोणत्याही आश्वासनाची अंमलबजावणी विद्यमान आमदाराने केलीच नाही तसेच आ.भारसाकळे यांच्याकडून नागास्वामी मंदिराच्या व भक्तांच्या अपेक्षा पूर्णपणे संपलेल्या आहेत तरीही विद्यमान आमदारांनी दरवर्षीप्रमाणे दर्शनाला येऊन फक्त महाप्रसादाचा लाभ घ्यावा बाकी इतर कोणतेही खोटे आश्वासन न देता यापुढे तरी भक्त परिवाराची फसवणूक ही करू नये अशा संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण भक्त परिवारातून उमटत आहे