hacklink al hack forum organik hit kayseri escort casibom 895 com girispadişahbet güncel girişdeneme bonusu veren siteler463 marsbahisdeneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinetürbanlı porno izle izmir escortvaycasino1winbetbigobetmatiktipobetcasibomgrandpashabetistanbul escortultrabet girişmatbet

INDIA NEWS

Press

पास घ्या पास..रस्ता नाही,एसटी नाही, कुठे तर शाळांच नाही..गोंधळलेल्या सरकारला विधानसभा जिंकण्याची घाई..

RaviRaj 17 june 2024

गोंधळलेल्या सरकारचे खोळंबलेले निर्णय..

Akola : भाजप सरकारला विशेषतः महाराष्ट्राच्या मिश्र सरकारमधील नेत्यांना लोकसभेचा पराजय खूप जिव्हारी लागल्याचे सरकारच्या वर्तणुकीतून व त्यांच्या निर्णय क्षमतेतून दिसून येत आहे.. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची अति घाई विद्यमान सरकारला झाल्याची दिसते.. विद्यमान सरकार हे गोंधळलेल्या अवस्थेत आहे.. सरकारमधील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.. त्यामुळे घाई घाईने येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अंदाधुंद निर्णय घेत आहेत.. तो म्हणजे 18 जून पासून म्हणजेच उद्यापासून विद्यार्थ्यांकरीता अभिनय योजना सुरू करण्यात आली असून त्यामध्ये सर्व शाळा हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना एसटी पासेस हायस्कूल व शाळेमध्येच उपलब्ध करून देण्यात येतील.. हा एक चांगला निर्णय उशिरा का होईना शासनाने घेतला..

परंतु प्रत्येक खेड्यापाड्यात एसटी बसेस ची सुविधा आहे का? जिथे सुविधा आहे तिथे शाळांच्या वेळेवर एसटी बसेस सुरू आहेत का? याकरिता एसटी महामंडळ कडे मुबलक एसटी बसेस आहेत का? सद्यस्थितीत ज्या बसेस रस्त्यावर धावतात त्यापैकी 25 टक्के बसेस जुन्या असल्यामुळे रस्त्यावरच बंद पडतात..शाळेची मुलं बस स्टॉप वर उभी असताना चालक व वाहकाच्या मुजोरीमुळे एसटी बस थांबा घेत नाहीत.. असे अनेक प्रश्न या योजनेच्या माध्यमातून उपस्थित झाले आहेत..

एसटी महामंडळाच्या बाबतीत सरकार मागील अनादी काळापासून उदासीन आहे.. शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची मुभा दिली आहे सोबतच महिलांना 50 टक्के सवलत सुद्धा दिली आहे.. हे सर्व निर्णय घेत असताना प्रवासी वाढवून तोट्यात असलेली एसटी ही नफ्यात आणण्याचा खटाटोप सरकारने केला..परंतु एसटी बसेसची संख्या मात्र तेवढीच उलट त्यामध्ये 25% बसेस ह्या नादुरुस्त आहेत..कुठेही प्रवासात बंद पडतात प्रवासामध्ये वेळेवर पोहोचण्याची हमी एसटी महामंडळ देऊच शकत नाही.. सरकारमधील मंत्री हे वातानुकूलित केबिनमध्ये बसून निर्णय घेतात तळागाळातील लोकांच्या समस्या काय आहेत त्यांचा रोजचा दैनंदिन एसटीचा प्रवास हा किती त्रासदायक आहे रोज किती लोकांशी वाद करून त्यांना एसटीमध्ये जागा मिळवावी लागते एसटीमध्ये चढण्या व उतरण्यासाठी किती मोठी कसरत करावी लागते.. ही कसरत जनसमान्यांना शारीरिक व मानसिक त्रासदायक ठरते.. मोबाईलवर इंस्टाग्राम फेसबुक वर रिल्स, व्हिडिओ व इतरांना मेसेज द्वारे माणुसकीचा कळवळा दाखवणारे सुद्धा एसटी बस मध्ये महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना जागा देऊ शकत नाहीत..

त्यामुळे विद्यमान सरकार मधील स्वतःला हुशार समजणाऱ्या एखाद्या मंत्र्याने 200 च्या वर प्रवास करणाऱ्या एसटी बस मध्ये प्रत्यक्ष प्रवास करून जनतेमध्ये किती माणुसकी शिल्लक आहे याचा अंदाज घ्यावा..हवेत निर्णय घेण्यापेक्षा निवडणूक जिंकण्याकरिता या लादलेल्या जबरदस्तींच्या योजनांचा किती भयंकर मानसिक व शारीरिक त्रास जनतेला होत आहे याची कल्पना सुद्धा सरकार करू शकत नाही.. उलट निवडणूक जिंकण्यासाठी या गोंधळलेल्या सरकारने अंमलात आणलेल्या योजनांचा बट्ट्याबोळ केला आहे..प्रवासादरम्यान बस मध्ये जागा घेण्यासाठीची धडपड गर्दीमध्ये घुसण्याकरिता केलेली चढाओढ ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा आदरभाव, महिलांबद्दलची सन्मानाची भावना व शाळकरी मुलांबद्दल चे प्रेम हे या योजनांमुळे पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे अगदी माणसांवर घडलेले चांगले संस्कार व माणुसकी ची वाट या सरकारने योजनांच्या माध्यमातून लावलेली आहे याला सर्वस्वी जबाबदार शिंदे सरकार असून आपापसात द्वेष भावना राग उर्मटपणा व शैतानी वृत्ती जागृत होण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन या माध्यमातून सरकारकडून होताना दिसत आहे..

या शुल्लक वादविवादात उरलेली माणुसकी सुद्धा संपूर्णपणे संपवण्याचे काम या सरकारकडून होत आहे.. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस या योजनांमुळे वाढत आहे त्यामुळे एसटी सुद्धा नफ्यात आहे ..परंतु पूर्ण तिकीट खर्चूनही प्रवाशाला सुविधा मिळतात तरी काय? याचा अभ्यास कधी सरकारमधील मीडियासमोर हिरोगिरी करणाऱ्या एखाद्या मंत्र्याने केला का? प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळी, शाळकरी मुले , अपंग असणाऱ्या लोकांच्या वेदना ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारने कधी केला का? नाही..ना.. सरकारला या सर्वसामान्य लोकांच्या भावना ,वेदना याच्याशी काहीही देणे घेणे नाही.. एसटी बसेस ची संख्या न वाढवता स्वतःचे अपयश झाकण्यासाठी जनतेला वेठीस धरून या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्यासाठीचा हा बालिश प्रयत्न असून हे सरकार सपसेल अपयशी ठरले

त्यामुळे एसटीची पास ही विद्यालय व शाळेत उपलब्ध करून देऊन त्या मुलांना शाळेपर्यंत पोहोचण्याकरीता रस्ताच नसेल विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागत असेल किंवा प्रवासाकरिता एसटी बसच उपलब्ध नसेल तर त्या पासेस चा उपयोग तरी काय..असे अनेक प्रश्न पालकांमधून व महाराष्ट्रातीलच सुज्ञ जनतेमधून उपस्थित होत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish