पत्रकारांवर हल्ला झाल्यास याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील-मार्कंडेय काटजू पीसीआय अध्यक्ष… पत्रकारांवर हल्ले हे लोकशाहीला घातक! जशास तसे उत्तर देऊ-राज ठाकरे..
RaviRaj 12 August 2023
जळगाव: जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातच नाही तर देशात सुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत सोबतच अनेक पत्रकार संघटना समोर येऊन कठोर कारवाईची मागणी करीत आहेत परंतु पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ला हा पहिल्यांदाच होतो आहे का? यापूर्वीसुद्धा अनेक पत्रकारांवर हल्ले होऊन त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे यामुळे लोकशाहीचा प्रबळ व मुख्य असलेला चौथा आधारस्तंभ हा डगमगताना दिसतो आहे या निमित्ताने पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे. अलीकडच्या काळात पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम फार जोरात सुरू असल्याचे दिसते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पत्रकाराला शांत करणे हाच एक अजेंडा समाजातील काही वाईट प्रवृत्तींचा असल्याचे दिसत आहे म्हणून पारदर्शक व निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारासोबत आज रोजी सर्व जनसामान्यांनी उभे राहण्याची गरज आहे कारण शासनकर्त्यांवर वचक ठेवण्याचे काम हे खरे पत्रकार बांधव करीत असतात आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत त्याचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो पत्रकारांवर हल्ला होणे हे दुर्दैवी असे हायकोर्टाने सुद्धा ताशेरे ओढले आहेत..
हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना ५० हजाराचा दंड आणि पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्याला आतमध्ये तुरुंगात पाठवण्यात येईल, पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. शासकीय सर्व यंत्रणांनी पत्रकारांना सहकार्य करावे आणि पत्रकारांशी आदराने बोला. नाही तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल अन्यथा एसएसपीएम कारवाई केली जाईल. पत्रकार जमावाचा भाग नाहीत हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी राज्य सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलिस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलिस जशी गर्दी हाटवतात तशी पत्रकारांना वागणूक देऊ शकत नाहीत. पोलिस किंवा अधिक यावर फौजदारीगुन्हा दाखल केला जाईल, असे काटजू म्हणाले. एखादा वकील आपल्या अशीलाला हत्येचा खटला न्यायालयात लढतो, तसा तो खुनी होत नाही. तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात प्रत्येक गर्दीचा भाग नसतात. त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव गृहसचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राजांच्या सचिवांना सूचना काढल्या असून पत्रकारांसोबत पोलिस, भूखंड माफिया, धन दांडगे व लोकप्रतिनिधी अशा लोकांकडून पत्रकाराला जीवे मारणे, खंडणी मागितली म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्यावर अत्याचार आता यापुढे केले तर संबंधितांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे तसेच आज राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड येथील जाहीर सभेत पत्रकारांवर च्या भ्याड हल्ल्या विरोधात कठोर शब्दात निषेध व्यक्त केला.. व यापुढे अशा प्रकारची घटना घडल्यास जशास तसे उत्तर देऊ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व पत्रकारांच्या सोबत असल्याचे ठासून सांगितले असून पारदर्शक व निर्भीड पत्रकारिता सदैव करत राहावे असे आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केले..
पत्रकारावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अजून कठोर कायदे करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा पत्रकारांना स्वतःचे संरक्षण करता यावे याकरिता उपायोजना म्हणून शस्त्र बाळगण्याचे परवाने द्यावेत अशा अनेक प्रकारच्या मागण्या राज्यातील वेगवेगळ्या पत्रकार संघटना कडून होत आहेत..