INDIA NEWS

Press

लोकांचा जीव झाला स्वस्त ! तीस रुपये वसूल करा फक्त..हा महानगरपालिकेचा नारा ! आणि अधिकारी खातात AC चा वारा..

RaviRaj 18 May 2025

अकोला गव्हर्नमेंट हॉस्पिटल समोरील कृत्रिम चौपाटी मुळे झालेले ट्राफिक जाम

अकोला शहरातील वर्दळीच्या मार्गावर एक नवीन कृत्रिम चौपाटी तयार झाली आहे या चौपाटी मध्ये पाणीपुरी, चायनीज, वडापाव सारखे जवळपास 100 च्या वर अनेक छोटे छोटे व्यवसायिक व्यवसाय करतात.. व सोबतच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात.. परंतु ही चौपाटी गव्हर्नमेंट हॉस्पिटल समोर असल्यामुळे वाटिका पासून तर हॉस्पिटलच्या गेटपर्यंत ही चौपाटी रस्त्याच्या दोन्ही कडेला व्यापलेली आहे.. त्यामुळे चौपाटी ही अकोला शहराची दिवसेंदिवस आकर्षण बनत चालली आहे.. रस्त्याच्या कडेला सायंकाळी अलोट गर्दी बघायला मिळते.. कधी कधी तर एवढी गर्दी असते की टू व्हीलर ,फोर व्हीलर, अगदी रस्त्यावर पार्किंग करून बिनधास्त पाणीपुरी व वडापाव खाण्याचा आनंद अकोलेकर घेत असतात..

अकोला महानगरपालिकेची चौपाटी मधील स्टॉल कडून वसूल केलेली तीस रुपयाची पावती

अगदी रस्त्यावर व बिनधास्तपणे केलेल्या पार्किंगमुळे राजरोसपणे सर्रास ट्राफिक जाम होऊन अकोलेकरांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील एकमेव असलेले गव्हर्नमेंट हॉस्पिटल या हॉस्पिटलला संपूर्ण जिल्ह्यातून अगदी कानाकोपऱ्यातून सिरीयस पेशंट ॲम्बुलन्स मध्ये येत असतात..एक एक सेकंद महत्त्वाचा असणाऱ्या ॲम्बुलन्स करिता तसेच जीव वाचवण्याकरिता धडपडत असलेली ॲम्बुलन्स ही हॉस्पिटलच्या आसपास पोचल्यावरही फक्त आणि फक्त चौपाटीच्या ट्राफिक जाममुळे पंधरा ते वीस मिनिटं लेट होण्याचे प्रकार घडत आहेत.. चौपाटीच्या आनंदापेक्षा ॲम्बुलन्स मध्ये येणारा जीव वाचवणे हा किती महत्त्वाचा असतो याचे भान प्रत्येक स्टॉलवाल्याकडून तीस रुपये टॅक्स वसूल करणारी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना नसणे म्हणजेच निर्दयतेचा कळस .. ही बाब सर्वांना माहिती असून सुद्धा चौपाटीच्या आनंदापेक्षा जीव स्वस्त झाल्याची अनुभूती या प्रकारांमधून येत आहे.. अकोलेकरांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते की सर्वात मोठा माणुसकी हा धर्म अकोलेकर हे विसरले की काय ? अकोलेकर एवढे निर्दयी कसे असू शकतात.. अशा प्रतिक्रिया एक एक सेकंद वाचवून पेशंटला हॉस्पिटलला लवकरात लवकर पोहोचवणे हेच एकमेव ध्येय असणारे ॲम्बुलन्स चालक यांच्याकडून येत आहेत..

अकोला गव्हर्नमेंट हॉस्पिटल समोर कृत्रिम चौपाटी मुळे अवैध पार्किंग ला महानगरपालीका कडून प्रोत्साहन..

एवढेच नव्हे तर याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आहे बाजूलाच पोलीस अधीक्षक कार्यालय आहे हे सर्व कर्मचारी येता जाता ट्राफिक जाम मध्ये अडकून पडतात तरीसुद्धा काही लोकांच्या फायद्यासाठी चुप्पी साधून बसलेले आहेत.. कधी कधी तर 50 ते 100 किलोमीटर प्रवास करून ॲम्बुलन्स गव्हर्मेंट हॉस्पिटल पर्यंत पोचल्यावरही ट्राफिक जाममुळे डॉक्टरांना पेशंटचा जीव वाचवणे शक्य होत नाही.. त्यामुळे जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आणि अकोलेकरांचे संस्कार सुद्धा.. त्यामुळे तीस रुपयांच्या टॅक्स करिता महानगरपालिकेचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे व अप्रत्यक्षपणे ॲम्बुलन्स मधील पेशंटची जीवित हानी होण्याकरिता प्रोत्साहन देण्यासारखे आहे.. त्यासोबतच जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांचे सुद्धा या सर्व प्रकाराला मुकसंमती असल्याचे दिसते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish