बंदोबस्तामुळे पोलीस कोमात अन् अवैध धंदे जोमात..
salim Khan 14 june 2025

मुख्यमंत्र्यांचा संवाद दौरा तर अजित पवारांचा मेळावा
अकोला जिल्ह्याला दबंग व्यक्तिमत्व लाभलेले पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्विकारल्या बरोबर प्रहार मोहिमेअंतर्गत अनेक ऐतिहासिक धडक कारवाया केल्या कुणाच्याही दबावाला बळी न पडता जिल्ह्यातील वरली, मटका, जुगार, क्लब, इतर सर्व अवैध धंद्यांवर धाडसत्र चालवून कुख्यात माफियांवर सुद्धा नियंत्रण आणले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद दौरा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा अकोला येथे पार पडला मागील दोन दिवसाच्या पूर्व तयारीमुळे दौऱ्याचे नियोजन व बंदोबस्त करिता जिल्ह्यातील सर्व पोलीस व्यस्त होते याचा चांगलाच फायदा अवैध धंदे करणारे माफीयांनी घेतला आहे पोलिसांच्या कमतरतेच्या अभावामुळे वरली, मटका ,जुगार व्यवसायिकांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला विशेषता अकोट मध्ये मागील दोन दिवसापासून खुलेआम आठवडी बाजार, आशियाना बार जवळील कॉम्प्लेक्स मध्ये व इतर अनेक ठिकाणी शहरी व ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध धंद्यांचा उत आला आहे

त्यामुळे अगदी जोमाने पोलीस अधिक्षक यांनी सुरू केलेली प्रहार मोहीम ही शिथिल झाल्याचे दिसून आले या निगरगट्ट माफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा प्रहार मोहीम ही अजून कडक करून मुख्य आका यांच्यावर कठोर कारवाई करून जेरबंद करणे गरजेचे आहे .अर्चित चांडक यांच्या बेधडक कार्यपद्धतीमुळे माफियांकडून पिळवणूक झालेल्या अनेक कुटुंबांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद होतील अशा आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु मागील दोन दिवसापासून पुन्हा या माफीयांची अरेरावी सुरू झाली त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रहार मोहीम सुद्धा थंडावणार का ? अशी शंका जनसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे







