मुख्याध्यापक संतोष चरपे चा आका कोण ? अमरावती बोर्डवर नियुक्ती ही संशयास्पद..संतोष चरपेचा कार्यकाळ वादग्रस्त
RaviRaj 10 march 2025
शिक्षक आईची हेखेखोरी तर मुलाची दादागिरी..
बोर्ड सदस्य पदी वडिलांची नियुक्ती करिता केली आमदाराची भक्ती..
आकोट येथील सरस्वती शाळेचे प्रकरण हे दिवसेंदिवस वेगळे वळण घेत आहे शिक्षक वर्षा गावंडे यांनी शासनाची दिशाभूल करून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची,पालकांची सोबतच शाळेची फसवणूक केलेली आहे
या सर्व प्रकाराचा भांडाफोड सर्व समाज माध्यमांवर मागील दोन दिवसापासून झाला वर्षा गावंडे यांचे पती मुख्याध्यापक संतोष चरपे यांची अमरावती बोर्ड यावर सदस्य पदी नियुक्ती झालेली आहे अमरावती बोर्ड मध्ये आज रोजी 16 सदस्य कार्यरत आहेत शैक्षणिक धोरणे, परीक्षेबाबत व पुढील पिढीचे तसेच देशाचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी इतर अनेक महत्वाचे निर्णय या सक्षम सदस्यांकडून घेतले जातात त्याकरिता अतिशय महत्त्वाची जबाबदारी या सदस्यांवर असते
त्याकरिता शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व स्वतः समाजात वावरताना योग्य आचरण करणारे वरिष्ठ शिक्षकांना या पदावर नियुक्त केले जात असल्याची परंपरा आहे
परंतु आजकालच्या गढूळ राजकारणामुळे शिक्षण क्षेत्रात सुद्धा जबरदस्त वशिलेबाजी करून संतोष चरपे सारखे सक्षम नसलेले शिक्षक या महत्त्वाच्या बोर्ड कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त होतात या पदाची गनिमा व न्याय देणारे अनेक नामांकित वरिष्ठ शिक्षक मात्र या वशिलेबाजांमुळे वंचित राहतात त्यामुळे पुढील पिढीचे भविष्य घडवणाऱ्या या बोर्ड कमिटी मध्ये तरी या वशिलेबाजांना थारा नसावा असे तज्ञांचे मत आहे
वर्षा गावंडे यांच्याकडून शासनाची फसवणूक केल्या जाते सोबतच गावंडे यांचे पती मुख्याध्यापक संतोष चरपे हे सक्षम नसून सुद्धा फक्त एका आमदाराच्या वशिल्याने बोर्ड कमिटी सदस्य झाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे सहजासहजी आई-वडिलांकडून वैभव लाभलेला मुलगा शंतनू चरपे याची एवढी हिंमत वाढली आहे की एका मीडिया हाऊस च्या कार्यालयात जाऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आहे
त्यामुळे हा चरपे परिवार विकृत मानसिकतेचा असल्याचा दावा शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी केलेला आहे