पीएसआय गणेश पाचपोर यांना स्पेशल ट्रीटमेंट.. रिटायरमेंट नंतरही कार्यालयीन खुर्ची उपलब्ध..
RaviRaj 15 Feb 2025
महाराष्ट्राच्या पोलीस विभागाच्या इतिहासात ही पहिली घटना अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील आहे रिटायरमेंट नंतरही त्याच जागेवर पेंडिंग कामांच्या नावावर पीएसआय गणेश पाचपोर यांना कार्यालयीन कामकाज करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पोलीस विभाग यांनी अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांची कायदेशीर सल्ला घेऊन रिटायरमेंट झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाचपोर प्रमाणेच संधी देऊन इतर कर्मचाऱ्यांवर येणारा कामकाजांचा दबाव हा कमी करावा व अकोट उपविभागीय अधिकारी यांची रिटायरमेंट नंतरही काम करून घेण्याची कला याबद्दल त्यांचा पोलीस विभागाने योग्य तो सन्मान करावा अशा प्रतिक्रिया रिटायरमेंट झालेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत..

अकोट पोलिसांना झाले तरी काय, पोटात पाय अन् गोगलगाय
रिटायर्ड झाल्यावरही खुर्चीचा मोह सुटेना, तरी वरिष्ठांना घाम फुटेना
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
अकोट
अकोट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत हरमकर मृत्यू प्रकरणात पीएसआय सह चार पोलीस कर्मचारी जेलची हवा खात आहेत आहेत त्यावेळी कर्तव्यावर असलेले ठाणेदार तपन कोल्हे यांना सुद्धा मुख्यालयी जावे लागले तरीसुद्धा अकोट पोलिसांवर वरिष्ठांचा कोणताही वचक दिसत नाही विशेषतः उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील एक महिन्यापूर्वीच रिटायर्ड झालेले पीएसआय गणेश पाचपोर आजही नियमित कार्यालयातील खुर्चीवर ड्युटीवर असल्यासारखे ऐटीत बसलेले दिसतात याबाबतीत पाचपोर यांना विचारणा केल्यास कार्यालयातील मागील कामे पेंडिंग असल्याचे सांगतात परंतु पाचपोर यांच्या जागेवर पीएसआय शेख यांची बदली झाली असल्यामुळे असे कोणते पेंडिंग कामे आहेत की पीएसआय शेख करू शकत नाहीत ती फक्त गणेश पाचपोरच करू शकतात याबाबतीत अनेक शंका उपस्थित होत आहेत त्यामुळे गणेश पाचपोर यांना जे विशेष प्रावधान उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी दिले त्याच प्रकारे महाराष्ट्रातील सर्वच पोलीस विभागात अशा प्रकारचे विशेष प्रवधान लागू केल्यास इतर कर्मचाऱ्यांवर पेंडिंग कामांचा ताण कमी होण्यास मदत होईल याची दखल तात्काळ पोलीस अधिक्षक अकोला व पोलीस महासंचालक मुंबई यांनी घ्यावी अशी चर्चा रिटायर्ड झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून दबक्या आवाजात होत आहे.