INDIA NEWS

Press

राजू ढोले यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? नगरपरिषद, कंत्राटदार की जेसीबी चालक

Salim khan 27 June 2025

नगरपरिषद,कंत्राटदार की जेसीबी चालक, मृत्यूला जबाबदार कोण ? राजू ढोले यांच्या परिवाराला भरपाई कुणाकडून नातेवाईकांमध्ये संभ्रम.. आठवडी बाजारातील सुरू असलेल्या कामावर ढोले यांची उपस्थिती संशयास्पद..

अकोट नगरपालिकेची महिमा न्यारी, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही 25 जूनला नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेला आठवडी बाजारातील रस्ता बांधकाम सुरू असताना राजू ढोले यांचा जेसीबीच्या धक्क्याने मृत्यू झाला याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित झाला आहे
राजू ढोले हे पंचायत समिती येथे खाजगी कारकुन म्हणून काम करत होते त्यांचा नगरपरिषद किंवा चालू असलेल्या कामाचा कोणताही संबंध नव्हता तरीसुद्धा राजू ढोले हे आठवडी बाजारात का उपस्थित होते त्यांना त्या ठिकाणी कोणी बोलावले होते का, की सहज इतरांप्रमाणे बघ्यांची भूमिका साकारत होते असे अनेक संशय या अपघातामुळे निर्माण झाले आहेत.
अख्खा उन्हाळा संपल्यानंतरच पावसाळ्यामध्ये या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याचा नगर प्रशासनाचा तथा कंत्राटदाराचा कोणता उद्देश असावा असे अनुत्तरीत प्रश्न अकोट करांच्या मनात गोंधळ निर्माण करीत आहेत.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ढोले यांच्या ॲम्बुलन्स ची अडवणूक करणारा चोहोट्टा बाजार येथील शंकर मिरटकर वर भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 126(2) 115(2)
351(2) 351(3) 324(2) 352 वाहनाची अडवणूक, चालकाला मारहाण व शिवीगाळ करणे अशा गंभीर गुन्ह्याची नोंद दहीहंडा पोलिसांनी केली आहे मिरतकर हा डुक्कर पालक असल्यामुळे त्याला ॲम्बुलन्स मधील पेशंटचे गांभीर्य समजले नसून पेशंट गंभीर जखमी असल्यामुळे अकोला पोहोचणे अशक्य होते असे काही प्रत्यक्षदर्शी यांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले.
तसेच अकोट शहर पोलिसांनी सुद्धा मृतक राजू ढोले यांच्या मुलांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय सहिता 2023 प्रमाणे 106 (2) नुसार कामात हयगय करून मृत्यूला कारणीभूत अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा जेसीबी चालकावर दाखल केला आहे मागील दोन दिवसापासून चालक हा फरार होता परंतु आज चालकाला पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे व पुढील तपास आकोट शहर पोलीस करीत आहेत परंतु या सर्व घडामोडी पाहता मृतक राजू ढोले यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? नगरपरिषद, कंत्राटदार की जेसीबी चालक असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून मृतकाच्या परिवाराला भरपाई कुणाकडून मिळणार की अपघाताच्या नावावर शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजाव्या लागणार असा यक्ष प्रश्न मृतक परिवारांसमोर उभा राहिलेला आहे या प्रकरणाचा तपास जलद गतीने अकोट शहर पोलीस करीत असून लवकरच या मृत्यू मागचे गुढ उकलण्यात पोलीस यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish